अमोल नाईक यांची जय मल्हार क्रांती संघटनेच्या महाराष्ट्र राज्य प्रवक्तेपदी निवड - चंदगड लाईव्ह न्युज

02 December 2020

अमोल नाईक यांची जय मल्हार क्रांती संघटनेच्या महाराष्ट्र राज्य प्रवक्तेपदी निवड

अमोल नाईक यांना निवडीचे पत्र देताना दौलत शितोळे

कोवाड - सी. एल. वृत्तसेवा

      कोवाड (ता. चंदगड) येथील अमोल भरमू नाईक यांची जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य युवक आघाडी मुख्य प्रवक्तेपदी निवड करण्यात आली.

      जय मल्हार क्रांती  संघटनेचे राज्य अध्यक्ष दौलत शितोळे यानी कोल्हापूर येथे झालेल्या राज्य कार्यकारीणीच्या बैठकीत अमोल नाईक याना  निवडीचे पत्र प्रदान केले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष रोहित नाईक, उपाध्यक्ष दादासाहेब नाईक, भारत नाईक, जयसिंग  चव्हाण, काकासाहेब चव्हाण, प्रदिप मदने, सतीश मलमे, राजाराम चव्हाण, बजरंग शिरतोडे आदि मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment