तुडये प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी द्या, अन्यथा आमरण उपोषण - चंदगड लाईव्ह न्युज

02 December 2020

तुडये प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी द्या, अन्यथा आमरण उपोषण

चंदगड / प्रतिनिधी

             चंदगड तालुक्यातील तुडये, हाजगोळी येथील प्रकल्प दात्यांच्या  जमिनी तिलारी जलविद्युत प्रकल्प साठी १९७६ ला शासनाने संपादन केल्या. त्यावेळी शेतकऱ्यांच्या अज्ञानामुळे पासष्ट टक्के रक्कम पर्यायी जमीन साठी भुसंपादन वेळी जमा केल्या नव्हत्या. आशा सर्व प्रकल्पदात्यांसाठी जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांनी चलन करून द्यावीत अशी प्रकल्पदाता संघटनेचे अध्यक्ष व शेकापचे नेते विजयभाई पाटील, तुडये येथील बाबू रामू पाटील, नारायण गावडू पाटील, कल्लाप्पा दतू पाटील, रामलींग  माणगावकर, मिलिंद पाटील इत्यादींनी मुख्यमंत्री, पुनर्वसन मंत्री, पाटबंधारे मंत्री यांना निवेदन दिले होते. त्याचबरोबर  जिल्हाधिकारी, पुनर्वसन अधिकारी, तहसीलदार यांना यापूर्वी भेटून निवेदन देवून विनंती केली होती. तसेच याकडे लक्ष न दिल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. सद्या १५८ शेतक-यांना कब्जे पट्टी देण्यात आली आहे.  तर २९० शेतक-यांना कब्जेपट्टी देण्यात आली नाही. तरी उर्वरित २९० शेतक-यांची चलने देवून त्याना जमिनी मोजून ताब्यात देण्यात यावी अन्यथा आमरण उपोषण केले जाईल असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रकल्प दात्या संघटनेचे अध्यक्ष विजयभाई पाटील यांनी म्हटले आहे.
No comments:

Post a Comment