पारगड येथे शाही पोवाड्याचा कार्यक्रम करून नवीन वर्षाची सुरवात - चंदगड लाईव्ह न्युज

01 January 2021

पारगड येथे शाही पोवाड्याचा कार्यक्रम करून नवीन वर्षाची सुरवात


पारगड येथील पोवाडा कार्यक्रमास उपस्थित मान्यवर


तेऊरवाडी-सी .एल. वृत्तसेवा

महाराष्ट्र नवनिर्माण सेना चंदगड यांच्यावतीने नवीन वर्षाची सुरुवात ही किल्ले पारगड येथे शाही पोवाड्याचा कार्यक्रम पार पाडून करण्यांत आली .

या कार्यक्रमाचे उद्घाटन जी.एन.पाटील  यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाले.यावेळी प्रमुख उपस्थितीत प्रताप उर्फ पिनू पाटील (उपजिल्हाध्यक्ष मनसे),राज सुभेदार (तालुकाध्यक्ष मनसे),बसवंत अडकुरकर, आर.एन.पाटील,प्रकाश पवार, योगेश बल्लाळ,विजय पाटकर, महानंतेश देसाई व दुर्गवीर प्रतिष्ठानचे सर्व मावळे यांच्या उपस्थितीत पार पडला.

या कार्यक्रमाचे आयोजन सरकारच लक्ष गडकिल्यांवर  वेधण्यासाठी व लोकांना गडकिल्ल्यावर येण्याची सवय लागावी या हेतूने पारगडावर या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते . 

हा प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेना चंदगडकडुन इंग्रजी नवीन वर्षाच्या निमित्ताने लोकांना गडावर येवुन महाराजांच्या आचार-विचार जोपासले जावे.लोकांना गडकिल्यावर येण्याची सवय लागावी यासाठी हा उपक्रम राबवला गेला होताअसे मत कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष प्रताप उर्फ पिनू पाटील यांनी मांडले.
 
या उपक्रमास दुपारी दोन वाजल्यापासून रात्री १०  वाजेपर्यंत येणाऱ्या गडप्रेमिंना भोजनाची सोय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून केलेली होती.यावेळी सुमारे २०० ते ३०० गडप्रेमीनी आस्वाद घेतला असुन अशा दुर्गम भागात सेवा देण्याचे कार्य माझ्या हातुन घडले,असे मत तालुकाध्यक्ष राज सुभेदार यांनी मांडले.


No comments:

Post a Comment