श्री शिवशक्ती हायस्कूल अडकूर येथे विद्यार्थी मोफत आरोग्य तपाणी - चंदगड लाईव्ह न्युज

01 January 2021

श्री शिवशक्ती हायस्कूल अडकूर येथे विद्यार्थी मोफत आरोग्य तपाणी

 

आरोग्य तपासणी आलेल्या वैद्यकिय पथकाचे स्वागत करताना प्राचार्य एस .जी. पाटील


अडकूर- सी .एल. वृत्तसेवा

श्री शिवशक्ती हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज अडकूर ( ता. चंदगड ) येथे इयत्ता ९वी ते १२ पर्यंतच्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींची  शासनाच्या आरोग्य विभागाकडून  मोफतआरोग्य तपासणी करण्यात आली .
      यावेळी आरोग्य पथकातील डॉ .सौ. स्नेहल पाटील यानी विद्यार्थीनिंची तर डॉ .पवार यानी विद्यार्थ्यांची संपूर्ण आरोग्य तपासणी केली .
प्राचार्य एस .जी. पाटील यानी वैद्यकिय पथकाचे स्वागत केले . प्रा . रामदास बोर्जे , प्रा .व्ही.पी. पाटील , प्रा .विष्णू पाटील ,आर. व्ही . देसाई , एस .के. हरेर , एस .के. पाटील , सी .डी. जोशी आदिजन, विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment