चंदगड निवडणूक निरीक्षक पदी भगवान कांबळे - चंदगड लाईव्ह न्युज

06 January 2021

चंदगड निवडणूक निरीक्षक पदी भगवान कांबळे

  


कोल्हापूर / प्रतिनिधी 

विभागीय आयुक्त पुणे यांनी चंदगड तालुक्यासाठी उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांची निवडणूक निरीक्षक म्हणून निवड केली आहे.

दि. 9 जानेवारी मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांच्या दुसऱ्या प्रशिक्षणाच्या दिवशी, प्रचार कालावधीत अचानक एका दिवशी, दि. 15 जानेवारी मतदानाच्या दिवशी व दि. 18 जानेवारी मतमोजणीच्या दिवशी निवडणूक निरीक्षक हे चंदगड तहसिलदार कार्यालयास भेट देणार आहेत .



No comments:

Post a Comment