देशाच्या सैनिकांचा आणि पत्रकारांचा सन्मान राखा - निवृत्त सुभेदार मेजर डी. आर. पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

06 January 2021

देशाच्या सैनिकांचा आणि पत्रकारांचा सन्मान राखा - निवृत्त सुभेदार मेजर डी. आर. पाटील

दाटे (ता. चंदगड) येथे पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना निवृत्त सुभेदार  मेजर डी. आर. पाटील, शेजारी उदयकुमार देशपांडे व नंदकुमार ढेरे.

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

         सदैव जागे राहून देशाच्या सिमांचे  रक्षण सैनिक करत असतात . तर देशातील सर्व घडामोडी  नि:पक्षपणे प्रत्येकापर्यंत पोहचवण्याचे कार्य पत्रकार करतात. सैनिक रक्षणाचे तर पत्रकार समाज घडवण्याचे कार्य करत असल्याने या दोघांचाही सन्मान राखण्याचे आवाहन भारतीय सैन्यदलाचे निवृत्त सुभेदार मेजर डी. आर. पाटील यांनी केले.

         मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असणाऱ्या चंदगड तालूका पत्रकार संघाच्या वतीने  दाटे (ता. चंदगड) येथे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन पत्रकार दिन म्हणून मोठ्या उसाहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमूख पाहूणे म्हणून सुभेदार मेजर पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकुमार ढेरे होते.

         प्रारंभी बाळशास्त्री जांभेकरांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन पत्रकार संघाचे संस्थापक उदयकुमार देशपांडे, संस्थापक अध्यक्ष अनिल धुपदाळे, नंदकुमार ढेरे यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर राज्यस्तरीय दर्पणरत्न पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल संजय पाटील, राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार मिळाल्याबद्द्ल एस. के. पाटील व लक्ष्मण आढाव यांचा सुभेदार मेजर पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर बेळगाव येथील दै. पुढारीचे वृत्तसंपादक संजय सुर्यवंशी याना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा राज्यस्तरीय विशेष पुरस्कार मिळाल्याबद्दल विशेष अभिनंदनाचा ठराव सर्वानुमते मांडण्यात आला.

          पत्रकार संघाच्या कार्याचा आढावा सुधीर देशपांडे यानी प्रास्ताविकात स्पष्ठ केले. तर पत्रकार हा समाजाचा आरसा असून पत्रकाराकडून समाजाच्या प्रचंड अपेक्षा आहेत. पत्रकारानी सदैव जागरूक राहून वृत्तांकन करण्याचे आवाहन अनिल धुपदाळे यानी केले. तर अध्यक्षीय भाषणात नंदकुमार ढेरे म्हणाले, पत्रकारांनी एक संघ राहणे गरजेचे असून विविध सवलतीसाठी शासनाकडे पाठपुरावा करणे गरजेचे असल्याचे सांगीतले.


       यावेळी एस. के. पाटील, संजय पाटील, लक्ष्मण आढाव यानी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाला उपाध्यक्ष श्रीकांत पाटील, चेतन शेरेगार, संतोष सुतार, संपत पाटील, महेश बसापुरे, संदिप तारिहाळकर, प्रदिप पाटील, प्रकाश ऐनापुरे, तातोबा गावडे आदि पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत पाटील यांनी केले. आभार संतोष सुतार यानी मानले.

No comments:

Post a Comment