![]() |
संपादक श्रीमती क्रांती सुहास हुद्दार यांना अधिस्विकृती कार्डचे वितरण करताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे. |
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सीमावर्ती बेळगाव जिल्ह्यातील मराठी वृत्तपत्रांच्या संपादकांना अधिस्वीकृती पत्रिकांचे वितरण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. वर्षा निवासस्थान येथील समिती सभागृहात हा समारंभ झाला.
यावेळी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री अदिती तटकरे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव विकास खारगे, सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव श्रीकांत देशपांडे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते बेळगाव जिल्ह्यातील दैनिक वार्ता च्या संपादक श्रीमती क्रांती सुहास हुद्दार व दैनिक स्वतंत्र प्रगतीच्या संपादक श्रीमती बबिता राजेंद्र पोवार यांना महाराष्ट्र शासनाच्या अधिस्वीकृती पत्रिकांचे वितरण करण्यात आले.
No comments:
Post a Comment