चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यात आज ४१ ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच निवडी शांततेत पार पडल्या. ४१ पैकी म्हाळेवाडी व धुमडेवाडी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच साठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्याने निवडणुका लागल्या. नंतर उर्वरित ३९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. तहसीलदार विनोद रणवरे यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडी शांततेत पार पडल्या.
चिंचणे अनुसूचित जमाती, माडवळे, मांडेदुर्ग व नांदवडे येथे अनुसुचित जाती स्त्री या वर्गाचे आरक्षण आले होते. पण या प्रवर्गातील स्त्री उमेदवार नसल्याने या ठिकाणी सरपंच पद रिक्त राहिले. या ठिकाणचा कारभार उपसरपंच पाहणार आहेत. निवडणुकांनंतर सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाल्याने निवडणुकीत म्हणावी तशी चुरस नव्हती. निवडणुकीनंतर सरपंच निवडी झाल्याने या सरपंच निवडणुकीत ही सुरस पाहण्यास मिळाले नाही.
No comments:
Post a Comment