चंदगड नगरपंचायतीच्या वतीने `स्वच्छ सर्व्हेक्षण, माझी वसुंधरा` अभियानांतर्गत कोरोना योध्दांचा सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

09 February 2021

चंदगड नगरपंचायतीच्या वतीने `स्वच्छ सर्व्हेक्षण, माझी वसुंधरा` अभियानांतर्गत कोरोना योध्दांचा सत्कार

चंदगड नगरपंचायत येथे स्वच्छ सर्व्हेक्षण व माझी वसुंधरा अभियानांतर्गत कोरोना योध्दांचा सत्कार करताना नगराध्यक्ष सौ. प्राची काणेकर, उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला.

चंदगड / प्रतिनिधी 

       चंदगड नगरपंचायतीच्या वतीने स्वच्छ सर्व्हेक्षण व माझी वसुंधरा अभियानांतर्गत कोरोना काळात मदतीच्या हात देणार्यांचा सत्कार  नगराध्यक्षा प्राची काणेकर यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला, नगरसेवक अभिजित गुरबे, दिलीप चंदगडकर, मुमताज मदार, नूरजहान नाईकवाडी, मेहताब नाईक, झाकिरहुसेन नाईक, नेत्रदीप कांबळे, आनंद हळदणकर, अनुसया दाणी, अनिता परीट, सचिन नेसरीकर, माधुरी कुंभार, रोहित वटंगी, संजना कोकरेकर, शिवानंद हुंबरवाडी, विजय कडुकर उपस्थित होते.

        यावेळी कार्यक्रमाच्या सुरवातीला मुख्याधिकारी अभिजित लक्ष्मण जगताप, श्रीशैल हुबंरवाडी यांनी कोरोनाबद्दल सुरक्षितता तसेच स्वछ सर्व्हवक्षण २०२१ मधील विविध विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच शहरातील स्वच्छतेबाबत सर्वांनीच जागरूक राहण्याबाबत आवाहन करण्यात आले. आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, इतर संघ आणि एजन्सी यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी संजय चंदगडकर यांनी शहरातील विकासाची महिती दिली.

No comments:

Post a Comment