![]() |
सुभेदार मेजर गजानन चव्हाण |
कालकुंद्री : विशाल पाटील
निपाणी येथील गजानन चव्हाण यांची ७ मराठा बटालियन च्या सुभेदार मेजर पदी नुकतीच अभिनंदनीय निवड झाली. प्रत्येक मराठी माणसासाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे.
![]() |
सुभेदार मेजर गजानन चव्हाण यांचा सत्कार करताना चंदगड तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी. |
शौर्य चक्र, किर्ती चक्र, अतिविशेष सेना मेडल अशा कित्येक पदकांनी सन्मानित झालेल्या सेव्हन मराठा बटालियनला मराठा रेजिमेंट मध्ये मानाचे स्थान आहे. यात कर्तव्य बजावताना सुभेदार मेजर पदापर्यतची मजल मारणे सोपे नाही. तो मैलाचा दगड गजानन चव्हाण यांनी गाठला. त्यांच्यासह सात मराठा परिवारासाठी हि अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. २०१० साली हवालदार पदावरुन नायब सुभेदार झाल्यानंतर बटालियनने दिलेली जबाबदारी अंत्यत्य कुशलतेने पार पाडली. अँडमिनिस्ट्रेशन, ट्रेनिंग, जनरल गार्ड या प्रत्येक जबाबदारीला योग्य न्याय दिला.
गजानन चव्हाण हे निपाणीतील दिवंगत स्वातंत्र्यसैनिक गोविंदमामा चव्हाण यांचे पुत्र आहेत. गोविंद मामा यांनी महात्मा गांधींच्या कार्याने प्रेरित होऊन १९४२ सालच्या छोडो भारत चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर भारतीय सैन्यात दाखल होऊन १९४५ चे दुसरे महायुद्ध, १९४८ व ५० ची भारतात उसळलेली दंगल, १९५६ पाकिस्तान बांगलादेश फाळणी, १९६२ व ६५ चे चिन आणि पाकिस्तान विरुद्ध युद्धात पराक्रम गाजवला होता. त्यांच्या ९८ वर्षीय मातोश्री श्रीमती कृष्णाबाई चव्हाण यांचे आशीर्वाद आणि प्रेरणा आजही त्यांच्या सोबत आहेत. गजानन यांचे भाऊ सुद्धा भारतीय सेनेत कार्यरत आहेत. सुभेदार मेजर गजानन हे सध्या दिल्ली येथे कार्यरत असले तरी त्यांची सेवा जम्मू-काश्मीर मधील अतिसंवेदनशील भागातच अधिक झाली आहे. ते एप्रिल २०२१ मध्ये सेवानिवृत्त होणार होते. पण देशसेवेचे बाळकडू बालपणातच मिळालेल्या गजानन चव्हाण यांनी सेवानिवृत्तीचे आरामदायी जीवन झुगारून अधिकची चार वर्षे देशसेवेला वाहून घेतले. यातच त्यांचे देश प्रेम दिसून येते. देश रक्षणार्थ सीमेवर २८ वर्षे शत्रुशी दोन हात करत तावुन सलाखुन निघालेले चव्हाण साहेब 'सुभेदार मेजर' बनल्याची वार्ता समजतात सेव्हन मराठा बटालियनच्या जवानांनी दिल्लीत आनंदोत्सव साजरा केला.
No comments:
Post a Comment