भाजप कोल्हापूर जिल्हा ओबीसी आघाडी सरचिटणीसपदी चेतन बांदिवडेकर यांची निवड - चंदगड लाईव्ह न्युज

09 February 2021

भाजप कोल्हापूर जिल्हा ओबीसी आघाडी सरचिटणीसपदी चेतन बांदिवडेकर यांची निवड

चेतन बांदिवडेकर

चंदगड / प्रतिनिधी 

       भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्हा ओबीसी आघाडीच्या सरचिटणीस पदी तुर्केवाडी (ता. चंदगड) येथील चेतन चित्तरंजन बांदिवडेकर यांची निवड करण्यात आली. भारतीय जनता पार्टीचे काम समाजातील प्रत्येक घटकात वाढवून त्यांच्या समस्या सोडवून पक्ष विस्ताराचे काम करावे. अशा अपेक्षेने पक्ष वाढीसाठी सशक्त संघटक निर्माण करण्यासाठी म्हणून भारत मारुती गुरव (जिल्हा अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा भारतीय जनता पार्टी ओबीसी आघाडी) यांनी नियुक्तीचे पत्र दिले.


No comments:

Post a Comment