चंदगड तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच निवडी, कोणत्या गावात कोणाची निवड? चार ग्रामपंचायतींचे सरपंचपद रिक्त? वाचा सविस्तर......... - चंदगड लाईव्ह न्युज

09 February 2021

चंदगड तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच निवडी, कोणत्या गावात कोणाची निवड? चार ग्रामपंचायतींचे सरपंचपद रिक्त? वाचा सविस्तर.........नंदकुमार ढेरे / सी. एल. वृत्तसेवा, चंदगड

     चंदगड तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि उपसरपंच निवडी प्रशासकीय अधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली शांततेत पार पडल्या. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. काही गावांच्या ग्रामपंचायतींमध्ये समान बलाबल असल्याने उमेदवारांची पळवापळवी झाली. धुमडेवाडी व म्हाळेवाडी येथील सरपंच व उपसरपंच पदासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्याने निवडणुका लागल्या. तर उर्वरीत ३९ ग्रामपंचायत सरपंचपदाच्या निवडी बिनविरोध झाल्या. तहसिलदार विनोद रणवरे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडी पार पडल्या. 

पुढीलप्रमाणे ग्रामपंचायतीनिहाय सरपंच व उपसरपंच असे : सुंडी सरपंचपदी मनोहर कांबळे तर उपसरपंचपदी सौ. शुभांगी पाटील. शिनोळी खुर्द सरपंचपदी परशराम पाटील तर उपसरपंचपदी सौ. पुनम खांडेकर, कौलगे सरपंचपदी सरोज अतवाडकर तर उपसरपंचपदी संजय पाटील, कानडी सरपंचपदी पुष्पलता देसाई तर उपसरपंचपदी हंबरीरराव पडते, तावरेवाडी सरपंचपदी माधुरी काजनकर तर उपसरपंचपदी गणपती खनगुतकर, ढोलगरवाडी सरपंचपदी सविता तुपारे तर उपसरपंचपदी पुनाप्पा तुपारे, किटवाड सरपंचपदी संगीता सुतार तर उपसरपंचपदी महेश पाटील, बोंजुर्डी सरपंचपदी सुरेखा पाटील तर उपसरपंचपदी आप्पासाहेब देसाई, दाटे सरपंचपदी अमोल कांबळे तर उपसरपंचपदी मधुरा साबळे, बुक्कीहाळ सरपंचपदी ममता पच्चेनट्टी तर उपसरपंचपदी जोतिबा बिर्जे, इब्राहीमपूर सरपंचपदी निळकंठ देसाई तर उपसरपंचपदी तुकाराम हरेर, आसगाव सरपंचपदी शांता नाईक तर उपसरपंचपदी विठ्ठल गावडे, केरवडे सरपंचपदी वृषाली करंबळकर तर उपसरपंचपदी रविंद्र सुतार, धुमडेवाडी सरपंचपदी रामकृष्ण पाटील तर उपसरपंचपदी देवाप्पा परमहंस, नागवे सरपंचपदी मनिषा देशपांडे तर उपसरपंचपदी मारुती नाडगोंडा, झांबरे सरपंचदी विष्णू गावडे तर उपसरपंचपदी रामकृष्ण गारडे, बसर्गे सरपंचपदी तुकाराम कांबळे तर उपसरपंचपदी सागर गुरव, मांडेदुर्ग सरपंचपद रिक्त राहिले असून उपसरपंचपदी गणपत पवार, देवरवाडी सरपंचपदी गितांजली सुतार तर उपसरपंचपदी गोविंद आढाव, कळसगादे सरपंचपदी अस्तिमा दळवी तर उपसरपंचपदी नेहा दळवी.

नांदवडे सरपंचपद रिक्त असून उपसरपंचपदी नारायण पाटील, सुरुते सरपंचपदी मारुती पाटील तर उपसरपंचपदी नागोजी नाईक, तुडये सरपंचपदी विलास सुतार तर उपसरपंचपदी अशोक पाटील, पुंद्रा सरपंचपदी सुवर्णा यमेटकर तर उपसरपंचपदी संतोष गावडे, होसुर सरपंचपदी राजाराम नाईक तर उपसरपंचपदी छाया पाटील, मलतवाडी सरपंचपदी भारती सुतार तर उपसरपंचपदी जयवंत पाटील, कोवाड सरपंचपदी अनिता भोगण तर उपसरपंचपदी पुंडलिक जाधव, म्हाळेवाडी सरपंचपदी चाळोबा पाटील तर उपसरपंचपदी विजय मरनहोळकर, घुल्लेवाडी सरपंचपदी युवराज पाटील तर उपसरपंचपदी शांताबाई पाटील, हाजगोळी सरपंचपदी कृतिका कांबळे तर उपसरपंचपदी दिपक पाटील, करेकुंडी सरपंचपदी पुनम पाटील तर उपसरपंचपदी अमरनाथ हुद्दार, बागिलगे सरपंचपदी नरसु पाटील तर उपसरपंचपदी अनुसया पाटील, मुगळी सरपंचपदी शोभा पाटील तर उपसरपंचपदी सोमनाथ मेघुलकर, राजगोळी बु॥ सरपंचपदी कविता पाटील तर उपसरपंचपदी संतोष नाईक, पाटणे सरपंचपदी गणफती दळवी तर उपसरपंचपदी सुमन कांबळे, किणी सरपंचपदी संदीप बिर्जे तर उपसरपंचपदी जोतिबा हुंदळेवाडकर, हलकर्णी सरपंचपदी मसणू गावडे तर उपसरपंचपदी रमेश सुतार, दिंडलकोप सरपंचपदी संजिवनी मनवाडकर तर उपसरपंचपदी अहमद अब्दुलअल्ली काझी, कालकुंद्री सरपंचपदी छाया जोशी तर उपसरपंचपदी संभाजी पाटील, माडवळे सरपंचपद रिक्त असून उपसरपंचपदी लता पाटील, चिंचणे सरपंचपद रिक्त असून उपसरपंचपदी संतोष पाटील यांची निवड झाली आहे. 


                       चार ग्रामपंचायतीचे सरपंचपद रिक्त

तालुक्यातील चिंचणे सरपंचपदाकरिता अनुसुचित जमाती तर माडवळे, मांडेदुर्ग, नांदवडे सरपंचपदाकरिता अनुसुचित जाती स्त्री या प्रवर्गातील आरक्षण होते. पण या प्रवर्गातील स्त्री उमेदवार नसल्याने या ठिकाणी सरपंचपद रिक्त राहिले आहे.No comments:

Post a Comment