![]() |
अलबादेवी ग्रामस्थांच्य वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. |
चंदगड / प्रतिनिधी
उत्साळी फाटा ते अलबादेवी व अलबादेवी ते अडकुर रस्तावरील झाडा-झुडपामुळे रस्ताच बंद होण्याच्या मार्गावर आहे. त्यामूळे संबंधित विभागाला सुचना द्याव्यात अशी मागणी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे अलबादेवी ग्रामस्थांनी केली आहे. या याबाबतचे निवेदन ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना देण्यात आले.
ग्रामस्थांचे श्रध्दास्थान असलेले रायीचे मंदिराकडे जाणार रस्ता व त्यावरील मोरीची दुरूस्ती करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.हेरे सरंजाम वर्ग दोन जमिनी संदर्भात ऐतिहासिक क्रांतिकारी निर्णय घेवुन शेतकरी वर्गाला दिलासा दिल्याबद्दल यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचा अलबादेवी ग्रामस्थांमार्फत सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रातांधिकारी विजया पांगारकर यांच्याकडे निवेदन सुपूर्द करत लक्ष घालण्यास सांगितले.
यावेळी माजी राज्यमंत्री भरमू पाटील, सभापती ॲड. अनंत कांबळे, जि. प सदस्य सचिन बल्लाळ, माजी जि. प सदस्य तात्यासाहेब देसाई, नगरसेवक दिलीप चंदगडकर, सत्तेवाडी उपसरपंच प्रदीप साबळे, संतोष इंगवले, नामदेव नार्वेकर,परशराम चौकूळकर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment