गुजरात मधील मोरबी शहरात शिवजयंतीचा उत्साह - चंदगड लाईव्ह न्युज

22 February 2021

गुजरात मधील मोरबी शहरात शिवजयंतीचा उत्साह

 

कालकुंद्री : प्रतिनिधी

 अखिल सौराष्ट्र महाराष्ट्रीयन मंडळ गुजरातच्या जिल्हा शाखांमार्फत मोरबी, द्वारका, राजकोट, जामनगर, जुनागड, सुरेंद्रनगर आदी शहरांत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा उत्साह पहावयास मिळाला. मोरबी येथे अखिल सौराष्ट्र महाराष्ट्रीयन मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजेश के पाटील (कालकुंद्री, ता. चंदगड, जि. कोल्हापूर) यांच्या हस्ते छत्रपतींच्या अश्वारुढ पुतळ्याचे पूजन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव च्या घोषणांनी मराठी बांधवांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी तेथील शिवसेना, करणी सेना, विश्व हिंदू परिषद व भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

  येथील महाराणा प्रताप चौकात महाराणांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी डॉ. राजेश पाटील यांच्यासह करणी सेनेचे अध्यक्ष देवेंद्र सिंह जडेजा, भाजप मोरबी जिल्हा महामंत्री महाविरसिंह चांदनी, मोरबी जिल्हा शिवसेना प्रमुख कमलेशभाई बोरीचा यांच्यासह घनश्याम सोलंकर रजनी सोनार, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक सोनार (अहमदाबाद), भास्कर सोलंकर, चंद्रकांत ढेरे, सचिन पाटील, सागर पाटील, शहाजी पाटील, दिनेश मारसेंटी, अमोल बनसोडे, जयदीप पाटील, विशाल सोनार, विष्णू मस्तूद, संतोष चौधरी, आकाश खरात, सुनील लिंगाडे, शिवाजी हंगे, मिहीर पाटील आदी महाराष्ट्रीयन बांधवांची उपस्थित होती. 
फोटो 

मोरबी येथे अश्वारूढ शिवपुतळ्याचे पूजन केल्यानंतर डॉ. राजेश पाटील यांच्यासह मान्यवर.


No comments:

Post a Comment