चंदगड : सी एल वृत्तसेवा
नवा संघर्ष कला, क्रीडा मंडळ तळेवाडी- वडरगे ता. गडहिंग्लज आयोजित मँरेथाँन स्पर्धेत १५ वर्षाखालील वयोगटात कालकुंद्री ता. चंदगड येथील धावपटू सुमित बंडू पाटील याने द्वितीय क्रमांक पटकावला. शिवजयंती निमित्त आयोजित मॅराथॉन स्पर्धेच्या या गटात एकूण साठ स्पर्धकांनी भाग घेतला होता. सुमित हा येथील श्री सरस्वती विद्यालयात इयत्ता आठवीत शिकत असून त्याला विद्यालयातील शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. तो रोज दहा किलोमीटर धावण्याचा सराव करत असून त्याने या वर्षात विविध स्पर्धांमध्ये यश मिळवले आहे.
No comments:
Post a Comment