विकेल ते पिकेल धोरणाअंतर्गत चंदगड येथे शेतकरी ते ग्राहक थेट शेतमाल विक्री केंद्राचा शुभारंभ, काय आहे ही संकल्पना? वाचा सविस्तर......... - चंदगड लाईव्ह न्युज

05 February 2021

विकेल ते पिकेल धोरणाअंतर्गत चंदगड येथे शेतकरी ते ग्राहक थेट शेतमाल विक्री केंद्राचा शुभारंभ, काय आहे ही संकल्पना? वाचा सविस्तर.........

शेतकरी ते ग्राहक थेट शेतमाल विक्री केंद्राचा शुभारंभ प्रसंगी प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसिलदार विनोद रणवरे, तालुका कृषी अधिकारी किरण पाटील व इतर. 

सी. एल. वृत्तसेवा, चंदगड

      कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा कोल्हापूर व तालुका कृषी अधिकारी चंदगड यांच्या संयुक्त विद्यमाने चंदगड मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथे विकेल ते पिकेल धोरणा अंतर्गत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियानाअंतर्गत शेतकरी ते ग्राहक थेट शेतमाल विक्री केंद्राचे उद्घाटन प्रांताधिकारी विजया पांगारकर यांच्या शुभहस्ते झाले.

       या केंद्रावर विद्या सिंगर राज महिला गृह उद्योग महिला शेतकरी मेथी, पालक, कोथिंबीर, शेवगा, वांगी, बटाटा इत्यादी भाजीपाला व विक्रीस उपलब्ध होती. या विक्री केंद्रावर क्विंटल भाजीपाला विक्री केंद्र आठवड्यातून दोन दिवस मंगळवार व गुरुवार सुरू राहणार आहे. तरी शेतकरी भाजीपाला पिकवतात व स्वतः विक्री करतात यांनी या केंद्रात नाव नोंदणी करून सहभाग घ्यावा. तसेच याप्रमाणे तालुक्यात माणगाव, पाटणे फाटा, ढोलगरवाडी, अडकुर, नागनवाडी, तूर्केवाडी, कोवाड, हलकर्णी अशा तालुक्यात शंभर ठिकाणी नवीन रयत बाजार सुरू करण्यात येणार आहे. सर्व शेतकरी बांधवांनी नोंदणी करावी असे कृषी विभागामार्फत आवाहन करण्यात आले आहे.

       या साठी संबंधित शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक यांना संपर्क करून आपले नाव नोंदणी करावे. बाजारामध्ये शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव, ग्राहकांना ताजी फळे व भाजीपाला वाजवी दरात उपलब्ध होईल अशी संकल्पना धरुन हा उपक्रम शेतकरी शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्या व थेट ग्राहकापर्यंत जोडण्याचे काम या उपक्रमात मार्फत होणार आहे. यासाठी प्रत्येक तालुक्यातील शंभर शेतकरी गट यांना शेतमाल विक्री व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी तालुक्यातील सहकारी भांडार, गृहनिर्माण संस्था, नगरपालिका, पंचायत समिती, ग्रामपंचायत स्थानिक व इतर यंत्रणा यांच्यात योग्य ते समन्वय ठेवून मूल्यवर्धित साखळी विकसित करण्यासाठी नियोजन करण्यात येणार आहे. 

          सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना सावलीसाठी छत्री, वजन काटा, टेबल-खुर्ची इत्यादी सुविधा सामाजिक उत्तरदायित्व निधी किंवा नाविन्यपूर्ण निधीतून देण्यात येणार आहे. जे शेतकरी सहभागी होणार आहेत. त्यांनी त्यांचा तपशील अध्ययावत सातबारा उतारा यासारख्या आवश्यक कागदपत्रासह पूर्तता करण्यात यावी. कार्यक्रमाला तहसीलदार विनोद रणवरे, तालुका कृषी अधिकारी किरण पाटील, अक्षय गावडे मंडळ कृषी अधिकारी कोवाड, यशोदीप पोळ मंडळ कृषी अधिकारी चंदगड, रामभाऊ पारसे सरपंच संघटना अध्यक्ष, प्रगतिशील शेतकरी अभिजीत धावणे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, चंदगड तहसिल कार्यालयातील अधिकारी कर्मचारी, कृषी सहाय्यक व तालुक्यातील शेतकरी हजर होते.
No comments:

Post a Comment