'माझा व्यवसाय - माझा हक्क' मेळाव्याचे शनिवारी आयोजन, मुख्यमंत्री रोजगार निर्मितीतून युवकांना संधी, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची उपस्थिती, कोठे, काय आहे संकल्पना? - चंदगड लाईव्ह न्युज

05 February 2021

'माझा व्यवसाय - माझा हक्क' मेळाव्याचे शनिवारी आयोजन, मुख्यमंत्री रोजगार निर्मितीतून युवकांना संधी, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची उपस्थिती, कोठे, काय आहे संकल्पना?

गडहिंग्लज / सी. एल. वृत्तसेवा

          मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांअंतर्गत 'माझा व्यवसाय- माझा हक्क' या स्वयंरोजगाराची संधी निर्माण करून देणाऱ्या उपक्रमाचा प्रारंभ गडहिंग्लजात येत्या शनिवारी (ता.06) होणार आहे. या कार्यक्रमाचे संयोजक नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनचे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. पश्चिम महाराष्ट्रातील हा पहिलाच स्वयंरोजगार मेळावा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

         ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत व मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयासमोर ,D.M प्लाझा भगवा चौक चर्च रोड,गडहिंग्लज येथे सकाळी 11.00 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. 

       कागल, गडहिंग्लज उत्तुर विधानसभा मतदारसंघातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी निर्माण करून देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमानंतर फॉर्म भरून घेतले जाणार आहेत. या उपक्रमांतर्गत फिरत्या व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार असून विविध उपयोगी कामांसाठी टाटा एस (छोटा हत्ती) उपलब्ध करून देण्यासाठी नाव नोंदणी होणार आहे.

          कागदपत्राच्या अधिक माहितीसाठी भगवा चौक चर्च रोड ,D.M प्लाझा येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय व हसन मुश्रीफ फाउंडेशन कार्यालयात अर्ज उपलब्ध असणार आहेत. सदर अर्जाचा कालावधी ०६ जानेवारी २०२१ ते १५ फेब्रुवारी २०२१ असा असणार आहे.


                                 *असा आहे उपक्रम*

या उपक्रमांतर्गत कृषीविषयक वाहतूक, फळभाज्या, चाट, नाश्ता, लंच, डिनर

यासह आठवडी बाजारातील विविध व्यवसाय करता येतील. त्यासाठी.....

🔴 पाच वर्षात एक लाख सूक्ष्म, लघु उपक्रम प्रस्थापित करणे.

🔴 १८ वर्षे पूर्ण तर ४५ वर्षाच्या आतील व्यक्ती पात्र.

🔴अनुसूचित जाती, जमाती, महिला, अपंग, माजी सैनिकांसाठी ५० वर्षे कमाल वयोमर्यादा.

🔴दहा लाखांवरील प्रकल्पासाठी सातवी, तर २५ लाखांवरील प्रकल्पासाठी दहावी उत्तीर्ण. एकाच कुटुंबातील एकाच व्यक्तीस लाभ.

🔴बँक कर्ज ६० ते ७५ टक्के, भांडवल पाच ते दहा टक्के, शासन अनुदान १५ ते ३५ टक्के, प्रवर्ग व संवर्गनिहाय बँक कर्ज.

🔴योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय आढावा व समन्वय समिती उत्पादन, सेवा उद्योग, कृषी पुरक व्यवसाय, कृषीवर आधारित उद्योग, फिरती विक्री केंद्र या योजनेअंतर्गत योजनेत सुरू करू शकता.




No comments:

Post a Comment