चंदगड वनविभागाकडून वन-वणवा सप्ताह साजरा, वनांच्या संर्वधनाचा दिला संदेश - चंदगड लाईव्ह न्युज

05 February 2021

चंदगड वनविभागाकडून वन-वणवा सप्ताह साजरा, वनांच्या संर्वधनाचा दिला संदेश

जंगलाचे संग्रहित छायाचित्र


चंदगड / प्रतिनिधी

        वन विभागामार्फत जंगलचे वणव्यापासून होणारे नुकसान टाळण्यासाठी दर वर्षी प्रबोधन, जनजागृती करण्यासाठी १ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारी या कालावधीत वन वानवा सप्ताह साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर चंदगड वनविभागाकडून वन वणवा सप्ताहाचा कार्यक्रम करण्यात आला. 
          वन वानवा सप्ताह निमित्ताने चंदगड वन विभागाकडून सह्याद्री महाविद्यालया व ज्युनियर कॉलेज हेरे येथे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी  चंदगडचे वनक्षेत्रपाल डी. जी. राक्षे यांनी मार्गदर्शन करून मानव -वन यांचे सहजीवन आणि मानवचे वनावरील असलेल्या अवलंबित्व याविषयी माहीती दिली. ``चंदगड तालुक्यातील निसर्ग संपत्ती, जैवविविधता, वन्यप्राणी या बाबत माहिती देऊन निसर्ग संपत्ती, जंगले यांचे रक्षण करणे, संवर्धन करणे हे मानवाच्या अस्तित्वासाठी महत्वाची बाबा असून हे प्रत्येकाचेच कर्तव्य आहे. आपण सर्वांनी जबाबदारीने वागून निसर्ग संपत्तीचे जतन करू या असे मत व्यक्त केले.``  
याच कार्यक्रमात  पी. व्ही. शिंदे (वनरक्षक वाघोत्रे) यांनी वनाचे आणि वन्यप्राण्यांचे महत्व सांगून वन विभाग जंगलाचे आगी आणि वणव्या पासून होणारे नुकसान टाळण्यासाठी करत असलेले प्रतिबंधक उपाययोजना. आग लागल्यानंतर ती विझवण्यासाठीचे करत असलेले शर्तीचे प्रयत्न या बाबतची माहिती देऊन वन कायदा १९२७ नुसार वनात आग लावने हा गुन्हा असून त्यासाठी दंड आणि १ वर्षे पर्यंतची करावासची शिक्षाचे तरतूद असलेबाबत सांगितले.
       या कार्यक्रम प्रसंगी वनपाल अनिल वाजे, बी. आर. निकम, दयानंद पाटील आणि वनरक्षक के. आर. सानप, खंडू कातखडे आणि इतर वनकर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक के. एन. सावंत (प्राचार्य, सह्याद्री विद्यालय व ज्युनियर  कॉलेज हेरे) यांनी केले. श्रीधर पाटील यांनी आभार मानले.





No comments:

Post a Comment