हंदेवाडी ग्रामस्थांचे कार्य कौतुकास्पद - प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी - चंदगड लाईव्ह न्युज

05 February 2021

हंदेवाडी ग्रामस्थांचे कार्य कौतुकास्पद - प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी

हंदेवाडी येथे पाणंद रस्ते कामाचा शुभारंभ करताना प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी

नेसरी / सी. एल. वृत्तसेवा

     हंदेवाडी (ता. आजरा) येथे ग्रामस्थांच्या सहकार्याने व महसूल प्रशासनाच्या प्रयत्नाने दोन साखळी रस्ते व दोन पाणंद रस्ते तयार करणेत येत आहेत. हे रस्ते करीत असताना सर्व शेतकऱ्यांनी अनुमती दर्शविली हा शेतकऱ्यांचा  खूप मोठा त्याग असून ग्रामस्थांचे कौतुक करावे तितके थोडेच असल्याचे मत येथील साखळी व पाणंद रस्त्याच्या उद्घाटन प्रसंगी प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी यांनी व्यक्त केले.
      यावेळी तहसीलदार विकास अहिर, सर्कल पी. व्ही. जोशीलकर, सर्कल जी. बी. पाटील, तलाठी संभाजी गाडीवडर यांचेसह प्रशासनातील कर्मचारी, पोलीस पाटील, कोतवाल आदिजनांची प्रमुख उपस्थिती होती. या भेटी दरम्यान डॉ. खिलारी यानी ज्यांची झाडे तुटली आहेत, ज्यांनी स्वखुशीने रस्त्यासाठी जागा दिली आहे अशा सर्वांचे कौतुक करून या सर्वांशी  दिलखुलास संवाद साधला. माहिलांशीही रस्त्यासंदर्भात संवाद साधून त्यांच्या परिवराचीही या भेटी दरम्यान खुशाली विचारणारे हे आपल्याच कुटुंबातील व्यक्तीआहेत असे ग्रामस्थांना वाटले. इतकेच नाही  तर डॉ. खिलारी यानी लहान मुलाला कडेवर उचलून घेऊन चालले व त्यांच्या सोबत फोटोही घेतले. प्रांतांधिकाऱ्यांची हि आजची भेट ग्रामस्थांसाठी आगळी वेगळी ठरली. दरम्यान जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनीही ग्रामस्थानी रस्त्यासाठी जागा देऊन झालेल्या नुकसानीची तक्रार केली नाही, या त्यागाबद्दल तयार झालेल्या रस्त्याची व्हिडीओ क्लिप पाठवून द्या असे सर्कल जोशीलकर यांना सांगून ग्रामस्थांचे कौतुक  केले. या  वेळी सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment