डिजीटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या राज्यकार्यकर्णी सदस्य पदी प्रमोद मोरे यांची निवड - चंदगड लाईव्ह न्युज

21 February 2021

डिजीटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या राज्यकार्यकर्णी सदस्य पदी प्रमोद मोरे यांची निवड

 


कोल्हापूर /  प्रतिनिधी

 डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या राज्य कार्यकारिणीवर सदस्यपदी लईव्ह मराठी चे संपादक प्रमोद मोरे यांची निवड झाली आहे. संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी आज अधिकृत पत्र देऊन त्यांच्या निवडीची घोषणा केली.

अवघ्या १० बाय १० फूट खोलीतून १५ डिसेंबर २०१६ रोजी ‘लाईव्ह मराठी’ची मुहूर्तमेढ कोल्हापूरमध्ये रोवली गेली. फक्त ३ सहकारी यांच्यासोबत सुरू असलेला हा प्रवास आज मोठा झाला आहे. आज ‘लाईव्ह मराठी’ परिवारात ५० हून अधिक सहकारी प्रमोद मोरे यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करीत आहे. 'सर्वांत अचूक आणि सर्वांत जलद' हे ब्रीद घेऊन ‘लाईव्ह मराठी’ कोल्हापूरच्या लाखो वाचकांच्या गळ्यातील ताईत बनले आहे.

यु ट्यूबवर ४३ हजार ४०० अधिक सब्सक्राइबर्स, फेसबुकवर १३ हजारहून अधिक फॉलोअर्स आणि वेबसाईटवर दररोज ४० ते ५० हजार हिट्स अशा पद्धतीने ‘लाईव्ह मराठी'ची दिमाखात वाटचाल सुरू आहे.

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी डिजिटल मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व घटकांचे हीत जोपासावे, या माध्यमाला सामाजिक मूल्ये प्राप्त करून द्यावे आणि सामाजिक जबाबदारीच्या चौकटीत राहून या क्षेत्रात काम करावे. यासाठी ही संघटना मुंबई येथे स्थापन केली असून मनुष्यबळ संघटन आणि या मीडियाच्या भावी धोरणामध्ये आमूलाग्र बदल करण्याचा उद्देशानेच प्रमोद मोरे यांच्या सारख्या तरुणाला संघटनेच्या राज्य कार्यकारणीवर सदस्य म्हणून काम करण्यास संधी दिली आहे. या निवडीमुळे प्रमोद मोरे आणि ‘लाईव्ह मराठी’ टीमचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment