शिवजयंती निमित्त वनविभागाकडून किल्ले पारगडावर स्वच्छता - चंदगड लाईव्ह न्युज

21 February 2021

शिवजयंती निमित्त वनविभागाकडून किल्ले पारगडावर स्वच्छता


चंदगड / प्रतिनिधी
शिवजयंती  वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यासाठी चंदगड वनविभागाच्या कर्मचारी वर्गाने किल्ले पारगड येथे स्वच्छता अभियान राबवले किल्ले पारगड परिसराततील गडावर श्रमदान करून प्यालस्टिक कचरा, बाटल्या, जेवणाच्या पत्रावळ्या, चहा पाण्याचे ग्लास जमा करून गड परिसर स्वच्छ केला. या स्वच्छता मोहिमेत वनरक्षक 
के आर. सानप,.सचिन होगले, वनमजुर .पावणू गावडे या वनकर्मचाऱ्यांनी आणि किल्ले पारगड येथे पर्यटन करण्यासाठी आलेले काही पर्यटकांनी सहभाग घेऊन स्वच्छता केली.
किल्ले पारगड परिसर हा निसर्गाने नटलेला आणि वन्यप्राणी यांचा मुक्त संचार व आदिवास असल्याने या ठिकानाचे सोंदर्य आणि छत्रपती च्या पदस्पर्शाने पावन झालेली गडावरील भूमीचे पावित्र्य टिकवण्यासाठी पर्यटकांनी पर्यटना साठी अलेवर गड परिसरात फिरताना प्यालस्टिक कचरा,पाण्याच्या बॉटल तेसच अविघटनशील कचरा इतरत्र टाकू नये कचरा कुंड्याचा वापर करून या ठिकाणीची सुंदरता टिकवण्यासाठी वन विभागास सहकार्य करावे अशी अपेक्षा, डी. जी.राक्षे वनक्षेत्रपाल चंदगड यांनी व्यक्त केली.No comments:

Post a Comment