स्वरा व आरोही गुरव राज्यस्तरीय शॉर्ट ॲक्ट स्पर्धेत द्वितीय - चंदगड लाईव्ह न्युज

21 February 2021

स्वरा व आरोही गुरव राज्यस्तरीय शॉर्ट ॲक्ट स्पर्धेत द्वितीय

 


चंदगड / प्रतिनिधी

    सात वर्षाखालील लहान मुला- मुलींसाठी 'आम्ही बंटीदा प्रेमी ग्रुप' गडहिंग्लज यांचे वतीने कोरोना विषयावर राज्यस्तरीय शॉर्ट ॲक्ट स्पर्धांचे आयोजन केले होते. सदरहू स्पर्धेत महाराष्ट्र राज्यासह कर्नाटक राज्यातील स्पर्धकांनीही उत्स्फूर्त सह भाग नोंदविला होता. या स्पर्धेसाठी तीन मिनिटांचा व शंभर एमबी साईज असणारा व्हिडिओ स्पर्धकाने तयार करून ह्यु मीडिया व गडहिंग्लजचे विद्यमान उपनगराध्यक्ष महेश कोरी यांचेकडे मेल केले. व्हिडिओ हा मराठी किंवा हिंदी भाषेत तयार करणे अनिवार्य होते. या स्पर्धेचा निकाल व बक्षीस वितरण कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. गडहिंग्लज नगरपरिषद , गडहिंग्लजच्या प्रांगणामध्ये बक्षीस वितरण कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला. गडहिंग्लज नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ स्वाती कोरी, उपनगराध्यक्ष . महेश कोरी ,नगरसेविका सौ वीणा कापसे, सौ. सुनिता पाटील ,सौ. क्रांतीदेवी कुराडे, माजी उपनगराध्यक्ष नितीन देसाई, नरेंद्र भद्रापूर,प्रसिद्ध उद्योजक . राजेंद्र मांडेकर व शहरातील सर्व तरुण मंडळांचे कार्यकर्ते,नागरिक व महिला उपस्थित होत्या. रोख तीन हजार एक रुपये व ट्रॉफी देऊन स्वरा प्रशांत गुरव व आरोही अमोल गुरव यांना गौरविण्यात आले. या शॉर्ट ॲक्ट मधून आरोही व स्वराने 'कोरोना को हरायेंगे, देश को जितायेंगे।' तसेच गडहिंग्लज शहराने कोरोना रोगाचे संक्रमण थांबविणे करता केलेल्या उपाययोजनांची माहिती अतिशय मार्मिकपणे,कृतीयुक्त व उठावदारपणे सादर केली. सदरहू विद्यार्थ्यांना पालक व श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय, गडहिंग्लज येथील शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले. या राज्यस्तरीय यशाबद्दल स्वरा व आरोहीचे सर्वत्र कौतुक होत आहे.No comments:

Post a Comment