छत्रपतीच्या इतिहासाचे जिवंत साक्षीदार, गड-किल्ल्यांचे पावित्र्य राखा - अखलाक मुजावर - चंदगड लाईव्ह न्युज

20 February 2021

छत्रपतीच्या इतिहासाचे जिवंत साक्षीदार, गड-किल्ल्यांचे पावित्र्य राखा - अखलाक मुजावर


 कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा

  विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गड-किल्ल्यांची विटंबना होणार नाही; त्यांचे पावित्र्य अबाधित राहील असे वर्तन किल्ल्यांना भेट देणाऱ्या पर्यटक व नागरिकांचे असले पाहिजे. असे प्रतिपादन सुप्रसिद्ध हिंदुत्ववादी व्याख्याते अखलाकभाई मुजावर (महागाव) यांनी केले ते राजगोळी बुद्रुक, ता. चंदगड येथे शिवजयंती निमित्त व्याख्यान देत होते. अध्यक्षस्थानी चंदगड तालुका भाजपा युवा अध्यक्ष भावकू गुरव होते.

 माजी सैनिक नारायण माने व महेश पाटील यांनी स्वागत केले. दत्ता गुरव यांनी प्रास्ताविक केले. पुढे बोलताना मुजावर म्हणाले, शिवछत्रपतींच्या पराक्रमाचा जिवंत इतिहास सांगणाऱ्या किल्ल्यांना तरुणांनी भेटी द्याव्यात तेथील इतिहास जाणून घ्यावा. केवळ मौजमजेसाठी अशा पवित्र ठिकाणी कोणीही जाऊ नये. स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिन राष्ट्रीय सणा दिवशी देशाला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी आपल्या प्राणांची व कुटुंबांची आहुती देणाऱ्या शहिदांच्या स्मरणार्थ उपवास करणे गरजेचे असताना जिलेबी खाऊन तोंड गोड करणे हा मूर्खपणाच म्हणावा लागेल असे मत व्यक्त केले. यावेळी मुंबईतील शिवसेना संपर्कप्रमुख चंद्रकांत नेवरेकर, कोवाड केंद्र शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत पाटील आदींची भाषणे झाली. कार्यक्रमास माजी सैनिक शंकर कोले, विजय टेंबुगडे, अक्षय महंत, शंकर बिर्जे, दिलीप केसरकर, दत्तात्रय मनगुतकर, दत्ता दुंडगेकर, संजय पाटील, अभिजीत पाटील आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. अनिल गुरव यांनी केले. यल्लाप्पा भरमगावडा यांनी आभार मानले.




No comments:

Post a Comment