चंदगडच्या मावळ्यांनी सातरा येथे साजरी केली शिवजयंती - चंदगड लाईव्ह न्युज

20 February 2021

चंदगडच्या मावळ्यांनी सातरा येथे साजरी केली शिवजयंती

 


चंदगड /प्रतिनिधी 

शहरात हॉटेल मध्ये नोकरीला असलेल्या चंदगड तालुक्यातील यूवकांनी सातारा शहरात शिवजयंती साजरी केली. 

नोकरी निमित्त विविध शहरात 

स्थिरावलेल्या चंदगड तालूक्यातील शिवप्रेमीं युवकांना शिवजयंती दरम्यान सुट्टीच्या अडचणीमुळे वर्षातून एकदा येणारी ही शिवजयंती त्यांना त्यांच्या गावी उत्साहात साजरी करता येत नाही, हे तितकंच वास्तव आहे.

पण चंदगडच्या मावळ्यांनी यावर उत्तर शोधले.गावी जाण्यापेक्षा जिथे आहे तेथेच एकत्र येऊन साताऱ्यामधे शिवजयंती उत्साहात साजरी केली. शिवरायांचे विचार जर मनात असतील तर शिवजयंती ही कुठेही साजरी होऊ शकते, हे या चंदगडच्या मावळ्यांनी दाखवून दिले.

या मावळ्यांनी साताऱ्यामधील शिवरायांच्या पदपर्शाने पावन झालेल्या सज्जनगड या किल्याला भेट दिली. सज्जनगड ते सातारा असा एकूण 20 कि.मीचा प्रवास चक्क पायी धावत धावत शिवस्फूर्ती घोषणामधे शिवज्योत घेऊन आले, साताऱ्यातील डबेवाडी येथील 'माँन्टीन व्हुव'  या हाँटेलच्या आवारात शिवजयंती साजरी केली.

 शिवस्फूर्ती गीतांनी या कार्यक्रमाची सांगता केली. याप्रसंगी अनेक शिवप्रेमी उपस्थित होते.

भरत भोसले, पँडी गावडे, प्रथमेश परब व आदी चंदगडच्या शिवप्रेमी युवकांनी एकत्र येत अत्यंत नियोजनबद्ध पध्दतीने साताऱ्यामधे ही शिवजयंती साजरी करून चंदगडवासीयांनी एक आदर्श घालून दिला आहे. त्यामुळे या चंदगडी मावळ्यांचे सर्व शिवप्रेमींकडून कौतुक होत आहे.



No comments:

Post a Comment