बसर्गेच्या भावेश्वरी देवीची यात्रा रद्द - चंदगड लाईव्ह न्युज

20 February 2021

बसर्गेच्या भावेश्वरी देवीची यात्रा रद्द

 

चंदगड / प्रतिनिधी

बसर्गे ता . चंदगड येथील ग्रामदैवत भावेश्वरी देवीची सालाबादाप्रमाणे शनिवार , २७ रोजी होणारी यात्रा रद्द करण्यात आली आहे .भावेश्वरी मंदिरात देवस्थान कमिटी व ग्रामस्थांची बैठक झाली. कोरोनाचा राज्यात वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे . यात्रेदिवशी व्यापा-यांनी आपली दुकाने घेऊन व भाविकांनी  देवीच्या दर्शनासाठी येऊ नये , असे आवाहन देवस्थान कमिटी मार्फत हरिभाऊ पाटील यांनी केले आहे.No comments:

Post a Comment