"तृप्ती मोटो ग्रीन हिरो इलेक्ट्रिक" शोरूमचे राज्यसभा खासदार श्रीमंत युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते शुभारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

19 February 2021

"तृप्ती मोटो ग्रीन हिरो इलेक्ट्रिक" शोरूमचे राज्यसभा खासदार श्रीमंत युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते शुभारंभ

खासदार संभाजीराजे तृप्ती मोटो ग्रीन शोरूमचे उदघाटन करताना

नेसरी / सी. एल. वृत्तसेवा

       नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे  तृप्ती मोटो ग्रीन हिरो इलेक्ट्रिक" शोरूमचे  राज्यसभा खासदार श्रीमंत युवराज संभाजी राजे छत्रपती यांच्या हस्ते उदघाटन झाले. त्याच प्रमाणे "आशिर्वाद ॲग्री एंटरप्राइसेस" शोरूमचे उद्धाटन अजितबाबा शिंदे नेसरीकर यांच्या हस्ते पार पडले. 

         यावेळी छत्रपती राजेंचा आणि अजितबाबा नेसरीकर यांचा सत्कार  सटुप्पा गोविंद पाटील यांच्या हस्ते, तसेच संजयदादा नेसरीकर, बी. एम.  पाटील आणि सुरजसिंह माने यांचा सत्कार सदाशिव पाटील यांच्या हस्ते तसेच   विद्याधर गुरबे, नेसरी पोलीस ठाण्याचे पी. एस. आय.  अविनाश माने, नेसरीचे सरपंच आशिषकुमार साखरे,  प्रकाश देसाई , विजयसिंह शिंदे यांचा सत्कार "तृप्ती मोटो ग्रीन व आशिर्वाद अॅग्री एंटरप्रायजेस" चे सर्वेसर्वा  तुषार पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

      या कार्यक्रमाचे अध्यक्षीय संबोधन संभाजीराजेंनी करून पाटील परिवारास शुभेच्छा दिल्या. "तुषारने इतक्या कमी वयामध्ये मोठे धाडस करून मोठी मजल मारली आहे तर त्याला या प्रवासात सुरजसिंह माने, विद्याधर गुरबे, आशिषकुमार साखरे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करण्याचे आवाहन करून  तरूणांनी फक्त शेती न करता शेतीला उद्योग व्यवसायाची जोड द्यावी." असा मार्गदर्शन पर मोलाचा सल्ला राजेंनी उपस्थितांना दिला. 

        आशिर्वाद अॅग्री एंटरप्रायजेस" या शोरूममध्ये भागातील शेतकऱ्यांना नवनवीन कृषी यंत्रे, सेंद्रिय खते, पशुखाद्य, असे बरेच काही उपलब्ध होणार आहे आणि "तृप्ती मोटो ग्रीन हिरो इलेक्ट्रिक" या शोरूममध्ये Hero कंपनीच्या उत्तम इलेक्ट्रिक स्कूटर उपलब्ध होणार असल्याची माहिती तुषार पाटील यानी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तृप्ती पाटील (मुंबई) व विनायक पाटील यांनी केले .आभार तुषार पाटील यानी मानले.

No comments:

Post a Comment