कडलगे बुद्रुक (ता. चंदगड) येथील माही यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. येथील सहींबदेव व थळदेव माही यात्रा दरवर्षी उत्साहात साजरी करण्यात येते. तथापि यंदा कोरोनामुळे यात्रा रद्द करण्याचा निर्णय सरपंच सुधीर गिरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या यात्रा कमिटीच्या बैठकीत नुकताच घेण्यात आला.
मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ग्रामस्थांच्या उपस्थितीत कमिटीने हा निर्णय जाहीर केला. या दिवशी केवळ मानकऱ्यांच्या उपस्थितीत देव देवतांची पूजा करण्यात येणार आहे. त्यामुळे पै-पाहुणे, खेळणी, फेरीवाले, हार-नारळवाले, हॉटेल, आईस्क्रीम, प्रसाद आदी दुकानदार व्यापारी यांनी या वर्षी येऊ नये. असे आवाहन कडलगे बुद्रुकचे सरपंच सुधीर गिरी यांनी ग्रामपंचायत, यात्रा कमिटी, पोलीस पाटील, तंटामुक्त कमिटी यांच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
No comments:
Post a Comment