पंढरपूर अपघातातील मयतांच्या वारसांना शिक्षक समितीची ८६ हजारांची आर्थिक मदत, जखमींना रोख, मयताच्या वारसाना ठेव स्वरूपात मदत - चंदगड लाईव्ह न्युज

19 February 2021

पंढरपूर अपघातातील मयतांच्या वारसांना शिक्षक समितीची ८६ हजारांची आर्थिक मदत, जखमींना रोख, मयताच्या वारसाना ठेव स्वरूपात मदत

बांदराईवाडा धनगरवाड्यावरील पंढरपूर अपघातातील मयतांच्या नातेवाईकांना व जखमींना आर्थिक मदत देताना शिक्षक समितीचे पदाधिकारी.

चंदगड / प्रतिनिधी

       चंदगड तालुक्यातील कोदाळी पैकी बांदराईवाडा (धनगरवाडा) येथील पंढरपूरला देवदर्शनला निघालेल्या नागरिकांचा अपघात होऊन एका चिमूकलीसह सहा जण मरण पावले तर अनेकजण जखमी  झाले. बांद्राईसह संपूर्ण चंदगड तालुक्यावर शोककळा पसरली. अशा प्रसंगी शिक्षक समितीचे दातृत्त्वाचे हात पुढे आले. चंदगड तालुका शिक्षण समितीच्या वतीने ८६ हजार रुपये इतकी मदत करण्यात जमा केल्याची माहीती अध्यक्ष धनाजी पाटील यांनी दिली. 

मदत देताना शिक्षक समितीचे पदाधिकारी.

      अपघातात जखमी झालेल्यांना उपचार करणेकामी विठ्ठल लांबोर यांच्याकडे रोखीने वीस हजार रुपये दिले. तर अपघातामध्ये मयत झालेल्या अनाथ मुला मुलींना पुढच्या शिक्षणासाठी भारती जानू लांबोर (२५०००ठेवपावती), धोंडिबा बबन लांबोर (१५०००ठेव पावती) कोमल बाळू लांबोर (१०००० ठेव पावती) जखमी रोहित कांबळे (रा. कलिवडे याला १५५०० रोखीने) अशी मदत शिक्षक समितीच्या वतीने देण्यात आली.

       निस्वार्थी भावनेने  यापूर्वीही  शिक्षक वर्गाकडुन बोंजुर्डीतील अनाथ मुले, महापूर अपद्ग्रस्तांना मदत, कोविड काळात केलेली मदत कोणत्याही प्रकारची प्रसिध्दी न करता, दिखाऊपणा न करता परिस्थितीचे भान ठेवून मदत केली आहे. सोशल मिडियाचा वापर खरोखरच बऱ्याच चागंल्या कामासाठी होऊ शकतो. त्यापैकीच हे एक काम "शिक्षक समिती परिवाराने"  करून दाखवून दिले आहे. असे मत अध्यक्ष धनाजी पाटील यांनी व्यक्त केले.

      यावेळी सरचिटणीस एन. व्ही. पाटील, जिल्हा उपाध्यक्ष गोविंद पाटील, राजू जोशी, मारुती चिंचणगी, गोविंद चांदेकर, प्रकाश रामू पाटील, रामचंद्र तुप्पट, विनायक गिरी, पाटकर, जोतिबा पाटील, अशोक चिंचणगी, सुभाष गवस, अप्पया पिटुक, सचिन पिटुक, जोतिबा पिटुक, सतीश माने, पुंडलिक चोपडे आदी उपस्थित होते.No comments:

Post a Comment