प्राचार्य आय. के. स्वामी यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

31 March 2021

प्राचार्य आय. के. स्वामी यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार

आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते  प्राचार्य आय.के. स्वामी यांचा सेवानिवृत्तीनिमित्य सत्कार करण्यात आला.

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

            श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल माणगाव (ता. चंदगड) चे प्राचार्य आय. के. स्वामी ३० वर्षांच्या प्रदिर्घ सेवेतून निवृत झाले. यानिमित्य आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते श्री स्वामी यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महादेव मंगेश पाटील होते.

         अध्यापन कौशल्य, नवोपक्रम, प्रशासन व व्यवस्थापन यामध्ये हातखंडा असणाऱ्या स्वामी सरांनी १९९१ पासून २०२१ पर्यंत अखंड ज्ञानदान केले. सलग १४ वर्ष मुख्याध्यापक म्हणून काम करत असताना बी. जी. काटे आदर्श मुख्याध्याक पुरस्कार, सामाजिक सेवा गौरव पुरस्कार मिळाले. त्यांच्या या निवृत्तीने विद्यार्थिप्रिय शिक्षक शिक्षण प्रवाहातून बाहेर जात असल्याचे मनोगत आमदार राजेश पाटील यानी व्यक्त कले. यावेळी उपस्थित नवमहाराष्टू शिक्षण संस्थेचा सर्व मुख्याध्यापक  व मान्यवरानी श्री स्वामी यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला सामाजिक, राजकिय, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment