कानूर बूद्रूक येथे गोवा बनावटीची दारू जप्त - चंदगड लाईव्ह न्युज

22 March 2021

कानूर बूद्रूक येथे गोवा बनावटीची दारू जप्त

चंदगड / प्रतिनिधी

       कानूर बूद्रूक (ता. चंदगड) येथे अवैद्यरित्या विक्री करण्याच्या हेतूने भरून चार पोत्यामध्थे भरून ठेवलेली गोवा बनावटीची ६९,२८०रूपयांची  ५४१ बाॅटल दारू जप्त करण्यात आली.    

     कानूर बूद्रूक येथील गावाजवळ असलेल्या टेक नावाच्या शेतामध्ये पडक्या झोपडीत चार पोत्यामध्थे आईस ब्ल्यू फाईन व्हिस्की कंपनीची ५४१ बाॅटल दारू चार पोत्यामध्थे भरून ठेवली होती. चंदगड पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार छापा टाकला असता बाॅटलसह दारूची पोती सापडली. मात्र दारू विक्री करणारे अर्जून पांडूरंग गावडे (रा. कानूर बुद्रुक) त्याचे अन्य दोन साथीदार माल जागीच टाकून पळून गेले. पोलिस निरीक्षक बी. ए. तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नाईक श्री. जाधव व श्री. सुतार अधिक तपास करत आहेत.



No comments:

Post a Comment