पूणे-मूंबई ग्रामस्थांच्याकडून अलबादेवी येथील जळितग्रस्त कुटुंबाला मदत - चंदगड लाईव्ह न्युज

22 March 2021

पूणे-मूंबई ग्रामस्थांच्याकडून अलबादेवी येथील जळितग्रस्त कुटुंबाला मदत

अलबादेवी (ता. चंदगड) येथील जळीतग्रस्त मनोहर शिवनगेकर यांना पुणे व मुंबई येथील ग्रामस्थ मंडळाकडून संसारोपयोगी साहित्य देताना पदाधिकारी. 


चंदगड / प्रतिनिधी

      अलबादेवी (ता. चंदगड) येथील नागरिक मनोहर पुंडलिक शिवनगेकर यांच्या रहात्या घराला पंधरा दिवसापूर्वी आग लागुन सर्व संसारउपोयोगी साहित्य जळुन खाक झाले होते. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत नेवगे यांनी समाज्यातील दानशुर व्यक्तींनी पुढे येवुन मदतीचे  अवाहन केले होते.

    पुणे व मुंबई ग्रामस्थ मंडळीं अलबादेवी यांनी दहा हजार  रुपये किमतीचे संसारपयोगी साहित्याची मदत केली. त्याचबरोबर जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष अप्पी पाटील, ग्रामपंचायत अलबादेवी, जिल्हा परिषद सदस्य सचिन बल्लाळ, गोपाळराव पाटील, माजी सभापती बबनराव देसाई, कॉंग्रेस तालुका अध्यक्ष संभाजीराव देसाई, अशोक कोळीसो (मंडळ अधिकारी), श्रीकांत नेवगे, नामदेव पाडले, प्रकाश कोले, विद्या मंदिर अलबादेवी शाळेचे शिक्षक, मयुर देसाई(उस्ताळी) यांच्यासह अनेकांनी आर्थिक स्वरुपाची तर  काहीनी वस्तू स्वरुपात मदत उपलब्ध करुन माणूसकी जपली. चंदगड येथील रवळनाथ बँक व्यवस्थापक शांताराम भिंगूर्डे यांनी देखील घरकुल बांधताना आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले.

No comments:

Post a Comment