कुदनुर ते कोल्हापूर दुपारची बस सुरू करण्याची प्रवाशांतून मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

22 March 2021

कुदनुर ते कोल्हापूर दुपारची बस सुरू करण्याची प्रवाशांतून मागणी

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा 

       गेल्या तीस वर्षापासून सुरू असलेली तथापि वर्षभरापासून कोरोनामुळे बंद असलेली दुपारची कुदनुर-कोल्हापूर बस सुरू करण्याची मागणी मार्गावरील सर्व  गावातून होत आहे.

     चंदगड आगाराची दुपारी साडेतीन वाजता  कुदनूरहून सुटणारी कोल्हापूर बस गेल्या तीस वर्षापासून सुरू आहे. दुपारी दीड वाजता चंदगड आगारातून सुटून मांडेदुर्ग, ढोलगरवाडी, कडलगे, नागरदळे, किणी, कोवाड, कागणी, कालकुंद्री ते कुदनुर येऊन दुपारी साडेतीन वाजता कोल्हापूरला निघते. व कालकुंद्री, कोवाड, तेऊरवाडी, नेसरी, गडहिंग्लज मार्गे कोल्हापूरला जाते. कोरोनामुळे वर्षभर ही बस बंद असल्यामुळे या मार्गावरील प्रवासी नागरिकांची कुचंबणा होत आहे. चंदगडहून कोवाड भागात येणारे नागरिक, कॉलेज विद्यार्थ्यांना ही बस अत्यंत गरजेची असून कुदनूर, कोवाड भागातून दुपारच्या वेळी कोल्हापूर कडे जाणारी एकही  बस नसल्याने नेसरी, महागाव, गडहिंग्लज, निपाणी, कोल्हापूरकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यावश्यक आहे.

        त्यामुळे ही बस सुरू करावी अशी मागणी  कुदनूर, कालकुंद्री, कागणी सह कडलगे परिसरातील ग्रामपंचायतींनी आगार व्यवस्थापक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत  विचारले असता येत्या दोन-तीन दिवसात ही बस नियमितपणे सुरू करण्याचे आश्वासन आगार व्यवस्थापक जी. के. गाडवे यांनी दिले. यावेळी सहाय्यक वाहतूक निरीक्षक ए. डी. मुल्ला, श्रीकांत पाटील, एस. पी. पाटील, शिवाजी पाटील, जी. ए. पवार आदी उपस्थित होते.



No comments:

Post a Comment