तेऊरवाडी येथे ७० लाखाच्या कामांचा लोकार्पण सोहळा - चंदगड लाईव्ह न्युज

22 March 2021

तेऊरवाडी येथे ७० लाखाच्या कामांचा लोकार्पण सोहळा

 तेऊरवाडीच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध - जि. प. सदस्य कल्लाप्पा भोगण

तेऊरवाडी येथे विविध विकास कामांचा शुभारंभ करताना जि.प. सदस्य कल्लापा भोगण, सौ .विद्या पाटील व इतर

तेऊरवाडी / सी.एल. वृत्तसेवा

      चंदगड तालूक्यातील तेऊरवाडी गावाची कोरडवाहू गाव म्हणून नोंद आहे. म्हणूनच  कोणतेही राजकारण न करता केवळ समाजकारणातून  या गावासाठी  जवळपास ७० लाख रुपयांच्या कामांचा लोकार्पण सोहळा संपन्न होत आहे. या गावच्या विकासासाठी जिल्हा परिषद कोल्हापूर च्या माध्यमातून सदैव कटीबध्द असल्याचे विचार जिल्हा परिषद सदस्य कल्लाप्पा भोगण यांनी व्यक्त केले. 

         तेऊरवाडी (ता चंदगड ) येथे राष्ट्रीय पेयजल योजनेचा लोकार्पण सोहळा व अंगणवाडी च्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात कल्लापा भोगण बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच श्रीमती सुगंधा कुंभार होत्या.

       श्री भोगण  पुढे बोलताना म्हणाले, ``जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जवळपास ५० ते ६० कोटींची कामे मंजूर केली आहेत. केवळ मतदार संघाचा विचार न करता संपूर्ण चंदगड तालुक्याच्या विकासासाठी सौ. विद्या विलास पाटील (जि. प. सदस्य) व माझ्याकडून प्रयत्न चालू आहेत. या गावासाठी अंगणवाडी, दलित वस्ती रस्ता, आरोग्य उपकेंद्र, शाळा दुरुस्ती, राष्ट्रीय पेयजल योजना अशी विविध विकास कामे पूर्ण केली आहेत. यापुढेही ब्रह्मदेव मंदिर  रस्त्यासाठी भरीव असा निधी देण्याचे आश्वासन जि. प. सदस्य श्री भोगण यांनी दिले. तुम्ही मला हाक द्या मी तुम्हाला विकासासाठी साथ देतो असे विचारही यावेळी बोलताना त्यांनी व्यक्त केले. 

       यावेळी विलास पाटील बोलताना म्हणाले, जि .प.च्या माध्यमातून पहिल्याच दिवशी ३० कोटींची कामे मंजूर केली होती. मतदार संघाच्या विकासासाठी सौ. विद्या पाटील श्री  भोगन यांना सहकार्य करण्याचे आव्हान त्यांनी केले.              

       प्रारंभी प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र भिंगुडे यांनी केले. गावामध्ये विविध विकास कामे चालू असून यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आव्हान  करून गावच्या विकासासाठी सहकार्य करणाऱ्या जिल्हा परिषद सदस्यांचे व पंचायत समिती सदस्य यांनी आभार मानले. यावेळी माजी सरपंच वाय. बी .पाटील प्रा. गुरुनाथ पाटील यांनी मनोगत व्यक्त केली. प्रारंभी विविध विकास कामांचा शुभारंभ रामचंद्र व्हन्याळकर, कल्लापा भोगन, विद्या पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते झाला. 

        या कार्यक्रमाला जि.प. सदस्या विद्या पाटील, पं. स. सदस्या सौ. नंदिनी पाटील, कोवाड सरपंच सौ. अनिता भोगण, उपसरपंच पुंडलिक जाधव, माजी सरपंच सौ. शर्मिला पाटील, वैजंता पाटील, मायापा पाटील, दत्तात्रय पाटील, तंटामुक्त अध्यक्ष प्रकाश दळवी, उपसरपंच सौ. शालन पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुनिल पाटील, पुंडलिक लोहार, सौ. संगिता पाटील, निर्मला कांबळे, शेवंता पाटील, ग्रामसेविका सुनिता कुंभार, पाणी पुरवठा  विभागाचे श्री. सावळगी, सर्व ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र भिंगुडे यांनी केले. सूत्रसंचालन एम. ए. पाटील यांनी केले. आभार पो. पाटील प्रकाश पाटील यांनी मानले.
No comments:

Post a Comment