चंदगड पंचायत समितीसमोर चंद्रकांत कांबळे यांचे ठिय्या आंदोलन, वाचा काय आहे कारण? - चंदगड लाईव्ह न्युज

03 March 2021

चंदगड पंचायत समितीसमोर चंद्रकांत कांबळे यांचे ठिय्या आंदोलन, वाचा काय आहे कारण?

चंदगड पंचायत समितीसमोर चंद्रकांत कांबळे यांचे ठिय्या आंदोलन सुरुच आहे. 

                       

चंदगड / प्रतिनिधी

        कुदनूर (ता. चंदगड) येथील तत्कालीन सरपंच सुखदेव शहापूरकर व ग्रामसेवक अनंत गडदे यांनी शासकीय निधीचा गैरव्यवहार केल्याचा आरोप करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. या मागणीसाठी चंदगड पंचायत समितीसमोर चंद्रकांत कांबळे यांचे बेमुदत ठिय्या आंदोलन सोळाव्या दिवशीही सुरू आहे. 

      विभागीय आयुक्तांच्या सुचनेनुसार उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी २८ मार्च २०१८ रोजी गटविकास अधिकारी चंदगड पंचायत समिती यांना सुखदेव शहापूरकर यांच्या काळातील कामाची चौकशी केली जावी. चौकशीत अपहार आढळून आल्यास त्याची जबाबदारी निश्चित करून शहापूरकर यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, असे कळविले होते. मात्र गटविकास अधिकाऱ्यांनी दोषी सरपंच व ग्रामसेवकांवर विभागीय आयुक्तांच्या आदेशान्वये फौजदारी केलेली नाही. त्यामुळेच सरपंच शहापूरकर आणि ग्रामसेवक अनंत गडदे यांच्यावर कारवाई करण्यासाठी कांबळे यांनी पंचायत समितीसमोर आंदोलन सुरू केले आहे.




No comments:

Post a Comment