सुंडी विद्यालयात विद्यार्थी, पालकांना वाहतूक नियमांबाबत मार्गदर्शन - चंदगड लाईव्ह न्युज

03 March 2021

सुंडी विद्यालयात विद्यार्थी, पालकांना वाहतूक नियमांबाबत मार्गदर्शन

सुंडी विद्यालयात विद्यार्थी व पालकांना वाहतुक नियमांबाबत मार्गदर्शन झाले. 

चंदगड / प्रतिनिधी

      सुंडी (ता. चंदगड) येथील संत तुकाराम हायस्कुलमध्ये इयत्ता ८ वी ते १० वीच्या विद्यार्थी व पालकांना "डिफेन्स ड्राईव्ह" कार्यक्रमांतर्गत वाहतूक नियमांची माहिती देऊन जनजगृती करण्यात आली.

    प्रारंभी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश मुख्याध्यापक एस. डी. घोळसे यांनी स्पष्ट केला. यावेळी वाहतूक नियम, धोके, कायदा याबाबत प्रकाश पाटील यांनी विदयार्थी, पालक व शिक्षकांना मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी एन. एम. पाटील होते. यावेळी मार्गदर्शक म्हणून एन. एन. पाटील, झि. नी. पाटील, केंद्रशाला मांडदुर्गचे मुख्याध्यापक एम. डी. नाईक, एम. के. भुजबळ, एस. एम. पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. व्ही. केसरकर यांनी केले. पी. एम. पाटील यांनी आभार मानले.No comments:

Post a Comment