कागणी- कालकुंद्री रस्ता डांबरीकरणाला मुहूर्त कधी? २० मार्चपर्यंत काम सुरू न झाल्यास आंदोलनचा इशारा - चंदगड लाईव्ह न्युज

09 March 2021

कागणी- कालकुंद्री रस्ता डांबरीकरणाला मुहूर्त कधी? २० मार्चपर्यंत काम सुरू न झाल्यास आंदोलनचा इशारा

 

कागणी कालकुंद्री रस्त्याचे उखडलेले बीबीएम

कालकुंद्री

रखडलेल्या कागणी ते कालकुंद्री या २ किमी रस्त्याचे गतवर्षी मार्च महिन्यात बीबीएम झाले होते. वर्ष उलटून गेले तरी डांबरीकरणाचा पत्ता नाही. याबाबत प्रवासी व वाहनधारकांत तीव्र संताप व्यक्त होत असून कालकुंद्री व परिसरातील ग्रामस्थांनी याप्रश्नी आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

   चंदगड तालुक्याच्या पूर्व भागातील कागणी ते कालकुंद्री हा अत्यंत महत्वाचा व वर्दळीचा रस्ता दोन वर्षापासून डांबरीकरण अभावी रखडला आहे. गडहिंग्लज, आजरा ते बेळगाव मुख्य मार्गाला कुदनूर, राजगोळी, दड्डी ते हत्तरगी येथे पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा  महत्त्वाचा रस्ता आहे. पंधरा वर्षे दुरावस्थेत असलेल्या या रस्त्या प्रश्नी शिवसेनेसह विविध संघटनांनी अनेक वेळा आंदोलने केल्यानंतर बांधकाम विभागाने नवीन पद्धतीने हा रस्ता डिसें. २०१८ मध्ये केला होता. तथापि  २०१९ च्या अतिवृष्टी व पुरात बांधकाम विभागाच्या नव्या 'मेथड' सह रस्त्याचाही फज्जा उडाला.  पुन्हा आंदोलनानंतर नव्याने रस्त्याचे काम सुरू झाले. गत मार्च महिन्यातील खडीकरण व बीबीएम नंतर डांबरीकरण रखडले आहे. तेही  उखडल्याने रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. दोन दिवसात साखर कारखाना हंगाम संपल्यानंतर ऊस वाहतूक थांबून कामातील अडथळेही कमी होतील. तरी संबंधित विभागाने २० मार्च च्या आत डांबरीकरण व साईड पट्ट्यांचे काम सुरू करावे. अन्यथा आंदोलनाचातील ग्रामस्थांनी दिला आहे.


No comments:

Post a Comment