![]() |
गडहिंग्लज येथील श्री रवळनाथ सोसायटीतर्फे नगरपालिका आणि उप जिल्हा रुग्णालयातील महिला सफाई कर्मचाऱ्यांना साडी चोळीचे वाटप करण्यात आले. |
गडहिंग्लज / प्रतिनिधी
गडहिंग्लज येथील श्री रवळनाथ सोसायटीतर्फे रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त महिला दिनाचे औचित्य साधून गडहिंग्लज नगरपालिका आणि उप जिल्हा रुग्णालयातील महिला सफाई कर्मचाऱ्यांना साडी चोळी देवून गौरविण्यात आले.
पासष्टहून अधिक महिला सफाई कर्मचाऱ्यांचा नगराध्यक्षा स्वाती कोरी आणि कागलच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष एम. एल. चौगुले होते. स्वच्छ भारत सर्वेक्षणात गडहिंग्लज नगरपालिकेने क्रमांक पटकावून साडे बारा कोटीची बक्षिसे मिळवल्याबद्दल नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी यांचाही या प्रसंगी सत्कार करण्यात आला. नगरपालिकेच्या या यशात स्वच्छता कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा असल्याचे नगराध्यक्षांनी आपल्या भाषणात सांगितले. कार्यक्रमाला निमंत्रित समाजसेवक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment