चंदगड तालुक्यात संजय गांधी योजनेची ६१ प्रकरणी मंजूर, आजच्या बैठकीत निर्णय - चंदगड लाईव्ह न्युज

31 March 2021

चंदगड तालुक्यात संजय गांधी योजनेची ६१ प्रकरणी मंजूर, आजच्या बैठकीत निर्णय

चंदगड येथील तहसिल कार्यालयात संजय गांधी योजनेच्या अर्जांची छानणी करताना अध्यक्ष प्रविण वाटंगी, नायब तहसिलदार संजय राजगोळी व इतर. 

चंदगड / प्रतिनिधी

      'चंदगड तालुका संजय गांधी योजना समितीमार्फत तहसिलदार कार्यालयात आयोजित मासिक बैठकीत ६१ प्रकरणे मंजूर करण्यात आली. अध्यक्षस्थानी चंदगड तालुका संगोयो चे तालुकाध्यक्ष  प्रवीण वाटंगी होते.

             या बैठकीत एकूण ६७ अर्जावर निर्णय देणेत आला. त्यापैकी ६१ अर्ज समितीमार्फत मंजूर करणेत आले. तसेच शासन निर्णय दिनांक २० ऑगस्ट २०१९ मधील निकषात न बसणारे एकूण ६ अर्ज नामंजूर करणेत आले. बैठकीला स्वागत  तहसिलदार चंदगड विनोद रणवरे यानी केले.यावेळी  गटविकास अधिकारी चंद्रकांत बोंडरे, सदस्य गुंडू मेटकुपी, सोमनाथ गरवस, सलीम मोमीन, मारुती पाटील, अशोक मनवाडकर, रणधीर सुतार,दत्ता नाईक,प्रीती गवारी,शीतल कट्टी उपस्थित होते. नायब तहसिलदार संजय राजगोळे यांनी आभार मानले.No comments:

Post a Comment