हलकर्णी येथील प्रा. ज्ञानेश्वर पाटील सेट परीक्षा उत्तीर्ण - चंदगड लाईव्ह न्युज

13 April 2021

हलकर्णी येथील प्रा. ज्ञानेश्वर पाटील सेट परीक्षा उत्तीर्ण

प्रा. ज्ञानेश्वर पाटील

चंदगड / प्रतिनिधी

       हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील  समाजशास्त्र विभागांमध्ये कार्यरत असणारे प्रा. ज्ञानेश्वर रामू पाटील समाजशास्त्र विषयातून सेट (State Eligibility Test )परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले. त्याचबरोबर शिवाजी विद्यापीठातील समाजशास्त्र विभागाअंतर्गत चंदगड तालुक्यातील ग्रामीण रोजगार हमी योजना :  एक समाजशास्त्रीय अभ्यास या विषयावर त्यांची पीएचडी ही चालू आहे. याशिवाय बी एड , एम ए - अर्थशास्त्र, डिप्लोमा इन एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन अँड मॅनेजमेंट, ॲडव्हान्स डिप्लोमा इन कंप्यूटर एप्लीकेशन कोर्स केले  आहे. 

No comments:

Post a Comment