ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांनी घेतली आवाडे पिता -पुत्रांची भेट, वाचा काय आहे कारण... - चंदगड लाईव्ह न्युज

04 April 2021

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांनी घेतली आवाडे पिता -पुत्रांची भेट, वाचा काय आहे कारण...

आवाडे पिता -पुत्रांच्या भेटीप्रसंगी गामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील.

कोल्हापूर / प्रतिनिधी

        गोकुळ दूध संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज रविवार दि. ४ एप्रिल २०२१ रोजी  सायंकाळी साडेपाच वाजता माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे व आमदार प्रकाश आवाडे यांची  त्यांच्या  इचलकरंजीतील निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. मंत्री श्री. मुश्रीफ व मंत्री श्री. पाटील या दोन्ही नेत्यांनी आवाडे पिता-पुत्रांनी गोकुळ दूध संघ निवडणुकीत राजर्षी शाहू शेतकरी आघाडीला पाठिंबा देण्याची विनंती केली.

        यावेळी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विलासराव गाताडे, प्रकाश सातपुते, नगरसेवक संजय कांबळे, प्रकाश मोरे, नगरसेवक मदन कारंडे, नगरसेवक प्रकाश पाटील, अमित गाताडे, बाळासो कलागते, शशांक बावचकर, पंचायत समितीचे माजी सभापती महेश पाटील आदी उपस्थित होते.No comments:

Post a Comment