चंदगड तालुक्यात आज १६ कोरोना रुग्णांची भर, ३४ रुग्णांची कोरोनावर मात, वाचा कोणत्या गावात किती कोरोना रुग्ण........ - चंदगड लाईव्ह न्युज

25 April 2021

चंदगड तालुक्यात आज १६ कोरोना रुग्णांची भर, ३४ रुग्णांची कोरोनावर मात, वाचा कोणत्या गावात किती कोरोना रुग्ण........



संपत पाटील, चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

देश, राज्यासह चंदगड तालुक्यातही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बसला आहे. त्यामुळे चंदगड तालुक्यातही दिवसागणिक कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. आज दिवसभरात चंदगड तालुक्यात १६ रुग्णांची भर पडली आहे. १ एप्रिलपासून आतापर्यंत १६६ रुग्ण पॉझिटीव्ह झाले आहेत. आज दिवसभरात चंदगड शहरातील ५ जण पॉझिटीव्ह सापडले आहेत. 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ज्यांना घरी अलगीकरणात राहण्याची सुविधा नाही. त्यांना कानुर येथील आरोग्य केंद्रात ठेवण्यात आले होते. मात्र ते फुल्ल झाले. त्यामुळे यापुढे पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांची शनिवारपासून चंदगड येथील स्टिफन शाळेत व्यवस्था करण्यात आली आहे. सद्या महाराष्ट्रामध्ये संचारबंदी आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच बाहेर जाण्यास परवानगी आहे. संचारबंदी काळात पुणे, मुंबई व अन्य शहरामध्ये नोकरीनिमित्त असलेले चाकरमानी लॉकडाऊनच्या भितीने गावी आल्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडली आहे. संचारबंदी असली तरी तरीही दिवसेनदिवस रुग्णांची संख्या वाढती आहे.

नागरीकांनी अनावश्यक घराबाहेर न पडता केवळ अत्यावश्यक कामासाठीच बाहेर पडावे. कोरोनाची हि साखळी तोडण्यासाठी प्रशासनासह स्वत:लाही मदत करावी. आपल्यासोबत अन्य लोकांचे जीव वाचविण्यासाठी यामुळे मदत होईल. अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी सात ते अकरा पर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी आहे. मात्र या वेळेत लोक गर्दी करत आहेत. किराणा माल घेताना व भाजी खरेदी करताना कोरोनाचे नियम पायदळी तुडविले जात असल्याचे चित्र आहे. शासन हे लोकांच्या भल्यासाठी नियम लावत असले तरी काही लोकांच्या बेफीकीरीमुळे असंख्य लोक अडचणीत येत आहेत. त्यामुळे या गोष्टीचा प्रत्येकाने गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. 

आज दि. 25-4-2021 चंदगड तालुका कोरोना अपडेट

आज दिवसभरात चंदगड तालुक्यात एकूण 16 पॉझिटीव्ह

चंदगड -५

किरमटेवाडी -२

भोगोली – २

ढोलगरवाडी -२

तुडिये – २

पाटणे – १

कोनेवाडी – १

कुदनूर – १


१ एप्रिल 2021 पासून आतापर्यंतची आकडेवारी 

एकूण पॉझिटीव्ह – १६६

बेरे झालेले – १६

उपचार घेत असलेले -१२७

मयत – ५

घरी अलगीकरणात असलेले – ५३

कंटेनमेंट झोन – ५०





No comments:

Post a Comment