महाराष्ट्रात मेपासून १८ वर्षावरील सर्वांना मोफत लस, महाविकास आघाडीचा निर्णय - चंदगड लाईव्ह न्युज

25 April 2021

महाराष्ट्रात मेपासून १८ वर्षावरील सर्वांना मोफत लस, महाविकास आघाडीचा निर्णय

मुंबई

      महाराष्ट्र राज्यातील १८ वर्षावरील सर्वांना १ मे पासून मोफत लस देण्यात येणार आहे. स्वस्त दरात चांगली लस उपलब्ध व्हावी म्हणून जागतिक टेंडर काढण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यसरकारच्या तिजोरीतून कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. मोफत लसीकरणासाठी लवकरात लवकर टेंडर काढण्यात येणार असल्याची माहीती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते व अल्पसंख्याक मंत्री @nawabmalikncp नबाब मलिक यांनी दिली. 

सद्या ४५ वर्षावरील सर्वांचे लसीकऱण केले जात आहे. मात्र काही दिवसापूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मे मध्ये १८ वर्षावरील सर्वांचे लसीकरण करण्याची घोषणा केली. मात्र याची जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी अशी सुचना केली होती. 
No comments:

Post a Comment