हात-पाय धुण्यास गेलेल्या चिमुकलीचा तोल गेल्याने शेततळ्यात बुडून मृत्यू, वाचा कोठे घडली घटना.... - चंदगड लाईव्ह न्युज

28 April 2021

हात-पाय धुण्यास गेलेल्या चिमुकलीचा तोल गेल्याने शेततळ्यात बुडून मृत्यू, वाचा कोठे घडली घटना....

अर्पिता प्रकाश रेडेकर

चंदगड / प्रतिनिधी

      मुगळी (ता. चंदगड) येथे  शेततळ्यात हात पाय धुण्यासाठी गेलेल्या मुलीचा तोल जाऊन पाण्यात बुडवून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अर्पिता प्रकाश रेडेकर (वय 9, रा. मुगळी, ता. चंदगड) असे या मुलीचे नाव आहे.मुगळी गावानजिक मोरेवाडी गावच्या हद्दीत धोडिंबा निंगोजी पाटील यांच्या शेतातील शेततळ्यामध्ये ही घटना घडली आहे. याप्रकरणी चंदगड पोलीसात कृष्णा शंकर रेडेकर (वय ४९, रा. मुगळी ता. चंदगड) यांनी व्रदी दिली आहे. 

       पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी कृष्णा रेडेकरा यांचे चुलत भाऊ आपल्या कुटुंबासह वडाचे माळ नावाच्या शेतावर राहण्यास आहेत. दरम्यान, आज त्यांच्या शेतात काजु वेचत असताना साधारण अकरा वाजण्याच्या सुमारास शेतातुन आरडाआरोडा ऐकु अली. बाहेर जावुन पाहिले असता प्रकाश रेडेकर यांची मुलगी अर्पिता ही रोडच्या पलीकडे पोरेवाडी गावच्या हद्दीत असले शेततळ्यामध्ये पडली असल्याचे समजले. गावातील लोकांनी तीला पाण्यातुन बाहेर काढले असता ती बेशुद्ध होती. त्यानंतर तीला प्राथमिक  उपचारा करिता ग्रामीण रुग्णालय चंदगड येथे नेण्यात आले असता डॉक्टरानी तपासून ती उपचारा पूर्वीच मयत झालेचे सांगितले.




No comments:

Post a Comment