मुख्याध्यापक धावले संस्थेच्या उपाध्यक्षाच्या अंगावर, ढोलगरवाडी येथील लाड विद्यालयातील प्रकार, पोलिसांत तक्रार दाखल - चंदगड लाईव्ह न्युज

28 April 2021

मुख्याध्यापक धावले संस्थेच्या उपाध्यक्षाच्या अंगावर, ढोलगरवाडी येथील लाड विद्यालयातील प्रकार, पोलिसांत तक्रार दाखल

 चंदगड /प्रतिनिधी :-- 

     ढोलगरवाडी (ता. चंदगड) येथील शेतकरी शिक्षण मंडळाच्या मामासाहेब लाड विद्यालयात  शिक्षणाधिकारी यांच्या आदेशाप्रमाणे शिक्षकांना हजर करून घ्यावे म्हणून सागण्यास गेलेल्या संस्थेच्या  संस्थापक उपाध्यक्ष तानाजी वाघमारे यांनाच प्रभारी मुख्याध्यापकांनी अंगावर धाऊन जात बाहेरचा रस्ता दाखवल्याने वाघमारे या पोलिसांत तक्रार दाखल केली आहे . मामासाहेब लाड विद्यालय , ढोलगरवाडी , ता.चंदगड येथे एस .आर.पाटील हे प्रभारी मुख्याध्यापक आहेत संस्थेतील शिक्षकांना कामावर हजर करून घ्यावे म्हणून संस्थापक उपाध्यक्ष तानाजी वाघमारे विद्यालयात गेले होते .पण मुख्याध्यापकांनी शिक्षकांना पोलिसांत तक्रार दाखल कामावर हजर करून घेण्यास नकार दिला . हे सर्व बेकायदेशीर आहे असे समजून सांगितले . मात्र त्यांनी बोलण्यास अटकाव केला व बाहेर जाण्यास सांगितले . मी या संस्थेचा संस्थापक उपाध्यक्ष आहे व मला धर्मादाय ची मान्यता आहे , असे सांगितले . वादग्रस्त संस्थेचा कारभार चालविण्याचा अधिकार धर्मादायलायला आहे . हे मी त्यांना सांगितले व तशा आदेशही दाखवला . तरी त्यांनी मुख्याध्यापक पाटील यानी आडदांड भूमिका घेऊन माझा अपमान केला व अंगावर धावून आल्यामुळे तानाजी वाघमारे यांनी चंदगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पो.नि.बी.ए. तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो कॉ.भदरगे अधिक तपास करत आहेत.
No comments:

Post a Comment