![]() |
उचगाव (बेळगाव) : नवीन रेड्डी यांचा सत्कार करताना प्रविण देसाई, सुधाकर करटे, किरण देसाई, सुशांत कुंडलकर आदी. |
कागणी : सी. एल. वृत्तसेवा
दूध उत्पादक शेतकऱ्यांचा विकास व्हावा यासाठी विविध योजना राबवून, दूध उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून सीमाभागात चांगला दर देण्याचे काम उचगाव फाटा येथील गणेश दूध संकलन केंद्राने केला आहे, या दूध संकलन केंद्राचा आदर्श इतर संघानी घ्यावा, असे मत उचगाव येथील केव्हीजी बँकेचे मॅनेजर नवीन रेड्डी यांनी व्यक्त केले.
रेड्डी यांचा धारवाड येथे बढती निमित्त बदली झाली. या निमित्ताने गणेश दूध संकलन केंद्रामध्ये कर्मचाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दूध केंद्राचे चेअरमन प्रवीण देसाई होते.
प्रास्ताविक दूध संघाचे व्यवस्थापक सुधाकर करटे यांनी केले. यावेळी दूध केंद्राचे संचालक किरण देसाई, प्लांट इनचार्ज सुशांत कुंडलकर, केव्हीजी बँकेचे संतोष पाटील, मिलिंद नार्वेकर, श्रिधर देसाई, अवधूत सुर्वे, विनायक सावंत, विनायक तरळे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment