आजरा कोव्हिड सेंटर ला समरजीतसिंह घाटगे यांची भेट - चंदगड लाईव्ह न्युज

06 May 2021

आजरा कोव्हिड सेंटर ला समरजीतसिंह घाटगे यांची भेट

 

आजरा कोव्हिड सेंटर ला समरजीतसिंह  घाटगे यांनी भेट दिली.

आजरा प्रतिनिधी/पुंडलिक सुतार

आजरा येथील कोविड सेंटर ला भारतीय जनता पार्टी चे जिल्हा अध्यक्ष छ. शाहू ग्रुप कागल चे अध्यक्ष 
समरजीतसिंह घाटगे यांनी भेट दिली..
  या भेटी मध्ये तहसीलदार विकास आहीर , तालुका आरोग्य अधिकारी . सोनवणे  आणि  आजरा कोविड सेंटर चे प्रमुख डॉ. देशमुख  यांनी कोरोना दुसऱ्या लाटेचा तालुका आढावा सांगितला. तसेच तालुक्यातील झालेली कोविड लसीकरण ची माहिती घेतली..
 अध्यक्षांच्या या दौऱ्याने कोरोना योध्यांचे मनोधैर्य नक्कीच उंचावले.
         या वेळी जिल्हा उपाध्यक्ष अशोक अण्णा चराटी, तालुका अध्यक्ष सुधीर कुंभार,महिला अध्यक्षा सौ. नयन भुसारी, सरचिटणीस नाथ देसाई,उद्योग आघाडी जिल्हा सदस्य सचिन इंदलकर,भ. वि. अध्यक्ष राजू चंदन वाले, उत्तूर् शहर अध्यक्ष प्रदीप लोकरे,प्रविण लोकरे,आजरा शहर अध्यक्ष वैभव नार्वेकर,युवा सर चिटणीस उदयराज चव्हाण, युवा उपाध्यक्ष विनोद जाधव, हर्षवर्धन माहागावकर, रामदास मिसाळ आदि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:

Post a Comment