लॉकडाऊनमध्ये वडापचे झाले वडाप, कर्जाचा डोंगर मात्र वाढला - चंदगड लाईव्ह न्युज

06 May 2021

लॉकडाऊनमध्ये वडापचे झाले वडाप, कर्जाचा डोंगर मात्र वाढला

संग्रहित छायाचित्र

अडकूर / सी. एल. वृत्तसेवा (संजिवनी देसाई)

       कोरोनाच्या काळात लॉक डाऊन केल्याने वडापधंद्याचे व इतर छोट्या व्यवसायांचे काम ठप्प झाले.

       या काळात कोरोनाला सर्व नागरिक तोंड देत आहेत पण ज्या लोकांचे छोटे- मोठे व्यवसाय आहे त्याना  याचा मोठा धक्का  बसत आहे. यामध्ये लाखो रुपयांचे कर्ज काढून वडाप चालवणाऱ्या वडाप धारकाना घरात बसण्याची वेळ आल्याने पैशाअभावी कुटंबाचेच वडाप होत आहे .

       चंदगड तालूक्यात अनेक  वाहनधारक वडापचा   व्यवसाय करतात. यासाठी १० ते १५ लाखांचे कर्ज काढून वाहने घेतली. त्याच्यावरच त्यांचे कुटुंब चालत होते.पण आता लॉक डाऊनमुळे  वडाप व्यवसाय ठप्प आहे . यामुळे उत्पन्न तर बंदच पण वाहनाचा कर्जाचे हप्ते वाढत चालले आहेत . त्यात वाहनाचे इन्शुरन्स काढणे अशक्यच. यामुळे कर्ज फेडायचे की कुटूबाला सांभाळायचे यामुळेआता काय होईल आपल्या कुटूंबाचे हा प्रश्न त्याना उद्भवत आहे?

          मार्च अखेर 2020 ते  मे  2021 पर्यंत सर्व व्यवसाय धारकांच्या गाड्या घरासमोर उभ्या आहेत. काही गाड्या मध्यंतरी सुरु झाल्या पण लाँकडाऊन आणि कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे परत सर्व व्यवसाय बंद करण्यात आले.असेच जर होत राहले तर ज्या गाडी व्यवसायाकांनी गाडी वर लोन किंवा ज्यांचे गाडी हप्ते भरायचे आहेत त्याना अडचणी निर्माण होत आहेत . असे चित्र दिसत आहे.सरकारकडून गाडी व्यवसायकांना काही व्यवसायिक योजना उपलब्ध होऊ शकेल का? अशी आशा त्याना वाटत आहे. 

       जर अशी कोणतीही योजना उपलब्ध झाली तर आज ज्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. ती परिस्थिती परत येणार नाही. चंदगड तालुक्यात आज मोठ्या प्रमाणात वडाप व्यवसाय खोळंबला आहे   सरकारने या व्यवसायाला मदत म्हणून काहीतरी योजनांचा विचार करावा अशी मागणी वडाप व्यवसाय धारकांनी केली आहे.No comments:

Post a Comment