चंदगड तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांचा उच्चांक, सायंकाळी ७ पर्यंत ८९ रुग्णांची नोंद, वाचा कोणत्या गावात किती. - चंदगड लाईव्ह न्युज

06 May 2021

चंदगड तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांचा उच्चांक, सायंकाळी ७ पर्यंत ८९ रुग्णांची नोंद, वाचा कोणत्या गावात किती.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

        राज्यात सर्वत्र संचारबंदी आहे. चंदगड शहरात तर सोमवारपर्यंत जनता कर्फ्यु पाळण्यात आला आहे. चंदगड तालुक्यात दिवसेनदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नागरीकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. त्यातच १८ ते ४४ वयोगाटातील नागरीकांचे अद्याप लसीकरण सुरु केलेले नाही. त्यामुळे तातडीने लसीकरण करण्याची गरज आहे. एकट्या चंदगड शहरात १ एप्रिल २०२१ पासून ८६ रुग्ण सापडले आहेत. त्यातील अनेकजण बरे होवून घरी गेले असले तरी शहरात रोज रुग्ण वाढत आहेत. हि चिंतेची बाब आहे. 

         चंदगड तालुक्यातील एका कंपनीमध्ये काही दिवसापूर्वी पंच्याहत्तर कोरोनाबाधित रुग्ण सापडले होते. यांच्या संपर्कात आलेल्या लोकही तपासणीनंतर बाधित सापडत आहेत. त्यामुळे हा आकडा भविष्यात वाढण्याची शक्यता आहे. आज सायंकाळी ७ वाजेपर्यंत चंदगड तालुक्यात ८९ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे. प्रशासन वेळोवेळी लोकांना सुचना देत आहे. मात्र काही लोकांच्याकडून बेफीकीरीमुळे अन्य लोकही अडचणीत येत असल्याचे दिसते. त्यामुळे घरी राहूनच आपण कोरोनाच्या या लढाईत खारीचा वाटा उचलू शकतो. स्वत:सोबत कुटुंबातील व संपर्कातील सर्वांचा बचाव करु शकतो. 

  दि. ६ मे २०२१  आरोग्य विभागाच्या अहवालानुसार आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत चंदगड तालुक्यात कोरोनाबाधित पासष्ट (६५) नवे रुग्ण.

  दि. ६ मे २०२१ आजची एकूण रुग्णसंख्या (८९). सायंकाळी ७ वाजेपर्यंत.

* चंदगड - ५

* अडकूर - ९

* उमगाव - २

* म्हाळेवाडी - १

* मलगेवाडी - २

* गुळंब  - ३

* कालकुंद्री - १

* सातवणे - ५

* हंबीरे - १

* पार्ले - १

* कोनेवाडी - १

* खालसा गुड़वळे - ६

* किटवाड - २

* करंजगाव - १

* मुगळी - २

* हजगोळी - ८

* पोरेवाडी - १

* हिंडगाव - २

* पेडणेकर वाडी - १

* शिनोळी बुद्रुक - ८

* माळी - १

* किणी - १

* खालसा कोळींद्रे - १

* कागणी - १

* देवरवाडी - १

* उत्साळी - १

* माडवळे - २

* करेकुंडी - ६

* हल्लारवाडी - १

* नागनवाडी - १

* कळसगादे - ६

* सदावरवाडी - २

* न्हावेली - १

* कोलिक - १

* कुद्रेमानी - १

* माणगाव - १

--------------------

एप्रिल २०२१ पासून आजपर्यंतची आकडेवारी

एकूण पॉझिटीव्ह - ५०६

कोरोनावर मात केलेले - १९८

उपचार घेत असलेले - ३०३

मयत - ५

घरी अलगीकरणात असलेले - २४५No comments:

Post a Comment