४ लाख ७० हजारची दारु जप्त, पोलीसांची मोठी कारवाई, महिन्याभरात तिसरी कारवाई - चंदगड लाईव्ह न्युज

31 May 2021

४ लाख ७० हजारची दारु जप्त, पोलीसांची मोठी कारवाई, महिन्याभरात तिसरी कारवाई

जप्त केलेल्या दारू साठ्या सोबत संशयित आरोपी व पोलिस

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
 येथील  आजरा आंबोली रोडवर तुळसी धाब्याजवळ आजरा पोलीसांनी कारवाई करत 4 लाख 70 हजार रुपयांची गोवा बनावटीची दारु जप्त केली आहे. 

  याप्रकरणी शिवाजी ग्यानबा भुते व गणेश महादेव पिंगळे (दोघे रा.खर्डा, ता. जामखेड, जि.अहमदनगर) यांच्यावर कारवाई केली आहे.हे दोघे आपल्या टाटा टेम्पो ( नं. MH 42 B 9873)  मधून गोवा बनावटीची दारु बेकायदेशीररित्या वाहतूक करत होते.गवसे जवळील तुळशी धाब्याजवळ या टेम्पोला पोलीसांनी अडवून तपासणी केली असता गाडीच्या हौदात सुमारे 4 लाख 70 हजारांची गोवा बनावटीची दारु आढळून आली. यामध्ये मॅकडॉनल नं. १ चे 121 बॉक्स (किंमत रु.3 लाख 71 हजार 712) व रॉयल व्हिस्की चे 24 बॉक्स (किंमत 97  हजार  920) या दारुप्रकाराचा समावेश आहे. गाडीसह 9 लाख 75 हजार 132 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

   आजरा पोलीसांची या महिन्यातील ही तिसरी कारवाई आहे. धामणे- बेलेवाडी रस्त्यावर एका कारवाईत 1 लाख 19 हजाराची दारु तर गवसे जवळील तुळशी धाब्याजवळ दोनवेळा कारवाई करत 10 लाख 4 हजारांची गोवा दारु जप्त केली आहे.



No comments:

Post a Comment