अहो, पाव्हणं ! नवरी आली चक्क ट्रॅक्टर चालवत लग्नमंडपात !! सैराट आर्चीची स्टाईल कोणत्या गावातल्या पोरीने मारली, वाचा चंदगड लाईव्ह ! - चंदगड लाईव्ह न्युज

31 May 2021

अहो, पाव्हणं ! नवरी आली चक्क ट्रॅक्टर चालवत लग्नमंडपात !! सैराट आर्चीची स्टाईल कोणत्या गावातल्या पोरीने मारली, वाचा चंदगड लाईव्ह !

गोजगा : ट्रॅक्टर चालवतच लग्नमंडपात जात असताना वधू पुनम यळगे.

कागणी : एस. एल. तारिहाळकर /सी. एल. वृत्तसेवा

होसूर (ता. चंदगड) येथून पाच किलोमीटर अंतरावरील गोजगे (ता. बेळगाव) येथे एका विवाह सोहळ्यात चक्क वधू ट्रॅक्टर चालवतच लग्न मंडपात आली. या प्रकारामुळे वऱ्हाडी मंडळींना अचानक धक्काच बसला. या प्रकाराची चर्चा परिसरात आपापसात सुरू आहे, अहो पाव्हणं, नवरी आली चक्क ट्रॅक्टर चालवत मंडपात !!

 नव्या जमान्यात आलिशान कारमधून आलेल्या वधुंचे चित्र पाहता या तरुणीने मारलेली सैराट चित्रपटातील आर्चीची स्टाईल आणि ट्रॅक्टर चालवून शेतकऱ्यांना मिळवून दिलेली प्रतिष्ठा, हा सारा प्रकार सर्वानाच धक्का देऊन गेला.

 शुक्रवार दिनांक 28 रोजी येथे गोज गा (ता. बेळगाव) मालू विश्वनाथ यळगे यांची एकुलती एक मुलगी पूनम हिचा मंडोळी येथील सुभाष आंबेवाडीकर या तरुणाशी विवाह झाला. पूनम हीचे दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे. घरचे ट्रॅक्टर असल्याने ती ट्रॅक्टर चालवण्यात पारंगत आहे. इतर सर्व वधू आलिशान कार मधून लग्न मंडपात येतात. पण धाडसी स्वभावाच्या पूनम हिने सैराट या मराठी चित्रपटातील आर्ची प्रमाणे काळा गॉगल घालून मंडपातच एंट्री मारली. तिचा पती सुभाष हाही ट्रॅक्टरचालक आहे. पूनमला बहिण वा भाऊ नाहीत, तर वडील हयात नाहीत. या प्रकाराने साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. सैराट या मराठी चित्रपटातील आर्चीच्या भूमिकेची सर्वांना आठवण झाली. हा प्रकार वेगळा असल्याने ट्रॅक्टर चालवतानाचे फोटो परिसरातील तरुण, तरुणी आपल्या व्हाट्सअप स्टेटस ठेवले ठेवले होते. तर काही तरुणांनी सोशल मीडियावर हा प्रसंग शेअर केला. 


No comments:

Post a Comment